Student Suicide : आयआयटीच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येस नवे वळण; बहिणीने केला जातीयतेचा आरोप

पवईतील आयआयटी मुंबई संस्थेत रविवारी एका 18 वर्षीय विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांनी जातीय भेदभावामुळे आपल्या मुलाला आत्महत्या करावी लागली असल्याचा आरोप केला आहे.
crime news
crime news esakal
Updated on
Summary

पवईतील आयआयटी मुंबई संस्थेत रविवारी एका 18 वर्षीय विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांनी जातीय भेदभावामुळे आपल्या मुलाला आत्महत्या करावी लागली असल्याचा आरोप केला आहे.

मुंबई - पवईतील आयआयटी मुंबई संस्थेत रविवारी एका 18 वर्षीय विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांनी जातीय भेदभावामुळे आपल्या मुलाला आत्महत्या करावी लागली असल्याचा आरोप केला आहे.

आयआयटी मुंबईतील बीटेक प्रथम वर्षाचा विद्यार्थी दर्शन सोळंकी याने गेल्या रविवारी वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मृत दर्शन सोळंकीची बहीण जान्हवी सोळंकीने माध्यमाशी बोलताना सांगितले की, घटनेच्या दिवशी दर्शनने त्याच्या बहिणीशी आणि कुटुंबीयांशी कॅम्पसमध्ये जातीय भेदभावाबद्दल माहिती दिली होती.

बोलत असताना दर्शनने सांगितले की, त्याचे मित्र त्याच्या जातीमुळे भेदभाव करत असल्याचा दर्शनच्या बहिणीने माहिती दिली. गेल्या महिन्यात घरी आल्यावरही त्यांनी कॅम्पसमधील जातिभेदाबद्दल कुटुंबियांना सांगितले. त्याने सांगितले की जेव्हा त्याच्या मित्रांना समजले की तो अनुसूचित जातीचा आहे, तेव्हा त्यांचे त्याच्याबद्दलचे वागणे बदलले, त्यांनी बोलणे बंद केल्याचा आरोप मृत दर्शनच्या बहिणीने केला आहे.

फोनवर बोलत असताना दर्शनने रविवारी बाहेर जाणार असल्याचे सांगितले होते. म्हणूनच दर्शनच्या बहिणीने त्याच्या खात्यावर काही पैसेही पाठवले असल्याचा दावा केला आहे. पैसे पाठवल्यावर तो म्हणाला माझ्याकडे पैसे आहेत आणि मला आत्ता त्याची गरज नाही असे दर्शन म्हणाल. बोलत असताना असं काही होऊ शकतं याची कल्पनाही नव्हती असल्याचे पिडीतच्या बहिणीने सांगितले आहे. दुसरीकडे आयआयटी मुंबईने एक निवेदन जारी केले की कॅम्पसमध्ये कोणताही जातीय भेदभाव नाही असे म्हणत कॅम्पसमधील कथित जातिभेदाचे खंडन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.