Mumbai Crime : बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज रॅकेट दहशतवाद विरोधी पथकाकडून उध्वस्त; 149 सिमकार्ड ताब्यात

राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने बेकायदेशीरित्या चालवल्या जाणाऱ्या टेलिफोन एक्सचेंजचा केला पर्दाफाश.
illegal telephone exchange
illegal telephone exchange sakal
Updated on

मुंबई - राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने बेकायदेशीरित्या चालवल्या जाणाऱ्या टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश केला आहे. एटीएसने या प्रकरणात 32 वर्षीय रियाझ मोहम्मद उर्फ पीके या आरोपीला डोंगरीतून अटक केली असून, तो केरळचा रहिवासी आहे.

मुंबई शहरातील डोंगरी भागात बनावट टेलिफोन एक्सचेंज असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानंतर बुधवारी 26 जुलैला अधिकाऱ्यांनी डोंगरीच्या ठिकाणावर छापा टाकला. कारवाईत एकूण 4 सिम बॉक्सशिवाय एअरटेल कंपनीचे 149 सिमकार्ड जप्त करण्यात आले. तसेच छाप्यात 5 लाख 71 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

चिनी सिमबॉक्सचा वापर

एटीएसच्या माहितीनुसार, रियाझ मोहम्मद हा केरळचा रहिवासी रियाझ मोहम्मद उर्फ पीके हा त्याच्या एका बांगलादेशी साथीदारामार्फत चीनमध्ये बनवलेल्या सिम बॉक्सचा वापर करून अवैध कॉल सेंटर चालवत होता. यासाठी त्याने घर भाड्याने घेतले होते. या कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशात कॉल करण्याची सुविधा होती.

भारतीय टेलिग्राफ कायद्याचे उल्लंघन करून बनावट टेलिफोन एक्स्चेंज भारतीय मोबाईल बेकायदेशीर मार्गाने चालवले जात होते.त्यानंतर बुधवारी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी डोंगरीच्या त्यांच्या ठिकाणावर छापा टाकला आणि आरोपी रियाझला अटक केली.

वाढता ट्रेण्ड

या छोट्या टेलिफोन एक्स्चेंजचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. चीनमध्ये बनवलेल्या सिम बॉक्सच्या माध्यमातून हा घोटाळा चालवला जातो. एका सिम बॉक्समध्ये अनेक सिम एकत्र रूट करून, परदेशातही कॉलची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या कॉलचा मागोवा घेणे कठीण असते. सध्या राज्याचे दहशतवाद विरोधी पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. संपूर्ण राज्यात अशा बनावट अशा प्रकारच्या कॉल सेंटर्ससंदर्भात एटीएसचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.