MNS : अवैध वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा...

मनसे वाहतूक अद्यक्ष संजय नाईक यांच्या परिवहन विभागाला इशारा
MNS
MNSsakal media
Updated on

मुंबई : परिवहन विभागाच्या (RTO) राज्यभरातील सीमा तपासणी नाक्यांवर वाहतुकदारांकडून अवैध वसुली केली जात असल्याचा आरोप करत, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे (MNVS) राज्याध्यक्ष संजय नाईक (Sanjay Naik) यांनी सोमवारी ठाणे आरटीओ कार्यालयात धडक दिली. त्यापूर्वी तलासरी सीमा तपासणी नाक्यांवर वाहतुकदारांकडून सुरू असलेल्या अवैध वसुलीचे( illegal work) चित्रण केल्याचा दावा त्यांनी केला असून, संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास गुरुवारपासून मनसे (MNS) आणि मनसे वाहतूक पदाधिकारी, कार्यकर्ते राज्यभरातील सीमा तपासणी नाक्यांवर ठिय्या मांडण्याचा (Strike) इशारा नाईक यांनी दिला आहे. ( illegal work of regional transport office mns party against it- nss91)

तलासरी सीमा तपासणी नाक्यांवर साध्या वेशात असलेले व्यक्ती सर्व वाहनांच्या फाईल जमा करतात त्यानंतर प्रत्येकी 700 ते एक हजार रुपयांची अवैध वसुली केली जाते. हा सर्व प्रकार नाक्यावरील अधिकाऱ्यांच्या पुढेच संगनमताने घडतो, याचे व्हिडीओ चित्रण केल्यानंतर अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारल्यास अधिकारी निरुत्तर झाले तर साध्या वेशात असलेले फाईल तपासणीच्या नावाखाली पैसे वसूल करणारे व्यक्ती पळून गेले. अशा घटनेचे व्हिडीओ मनसे पदाधिकाऱ्यांनी आपल्या कॅमेरात रेकॉर्ड केल्याचा दावा संजय नाईक यांनी केला आहे.

MNS
मुंबईतील कोर्टाचा कंगनाला अंतिम इशारा, अन्यथा अटक वॉरंट अटळ

परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावरील आरटीओ अधिकारी वाहतुकदारांना नाहक अवैध पैशांची मागणी करून त्रास दिला जात आहे. या भ्रष्टाचारावर गुरुवार पर्यंत कारवाई करा, संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा अन्यथा गुरुवार पासून मनसे आणि मनसे वाहतूक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून राज्यातील सीमा तपासणी नाक्यांवर ठिय्या मांडून वाहतुकदारांची लूट थांबविण्यासाठी आपल्या पद्धतीने प्रयत्न करणार असल्याचा इशारा सुद्धा नाईक यांनी ठाणे आरटीओ रवी गायकवाड यांना देण्यात आला आहे.

तलासरी सीमा तपासणी नाक्यांवर आरटीओ अधिकारी विना नेमप्लेट असतात, शिवाय साध्या वेशातील अनोळखी व्यक्तींकडून कागदपत्र तपासणीच्या नावावर पैसे वसूल केल्या जाते. त्यामुळे वाहतुकदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात ठाणे आरटीओ गायकवाड यांची भेट घेऊन गुरुवार पर्यंतची कारवाई करण्याची मुदत दिली आहे.

- संजय नाईक, अद्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.