मुंबई, ता. १९ : मुंबई, कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टीवर ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अशातच मुंबईचे तापमान ३४ अंशांच्यावर गेले असताना पावसाच्या हलक्या सरींनी एकीकडे मुंबईकरांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे मुंबईसह ठाणे, पालघर आणि दक्षिण कोकणात रविवारी ‘यलो अलर्ट’ असल्याने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.