#NisargaCyclone : मुंबईकरांनो राहा तयार, साधारण 'या' वेळी आणि इथं धडकणार निसर्ग चक्रीवादळ

#NisargaCyclone : मुंबईकरांनो राहा तयार, साधारण 'या' वेळी आणि इथं धडकणार निसर्ग चक्रीवादळ
Updated on

मुंबई :  मुंबईकडे येत असलेले चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. त्याचा वेग  संध्याकाळपासून आणखी जास्त वाढेल. यानंतर निसर्ग चक्रीवादळ बुधवारी पहाटे अलिबागला धडकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

सध्या मुंबईकडे येत असलेल्याचे सहा तासात वादळात रुपांतर होईल आणि पुढील बारा तासात त्याची तीव्रता आणखी वाढेल. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळ हे उद्या सकाळी साडेपाचपर्यंत मुंबईत धडकू शकतं. निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता मुंबई वेधशाळेच्या आधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

याआधी ओडिशामध्ये आलेलं अम्फान चक्रीवादळात ताशी 210 ते 215 ताशी किमी वेगाने वारे वाहले होते. त्यातुलनेत हे निसर्ग वादळ कमी तीव्रतेचे असणार आहे. अम्फान इतका याचा धोका नसेल, मात्र निसर्गमुळे जोरदार पाऊस वादळी वारे वाहतील. 

दरम्यान, या चक्रीवादळाचा अंदाज वर्तवण्यात सुरुवातीस आघाडीवर असलेले ऍडम सोबेल यांच्यानुसार या वादळास 'निसर्ग'हे नाव देण्यात आलेले नाही. मात्र भारतातील माध्यमांनी यास असेच संबोधण्यास सुरुवात केली आहे, असा दावा केला आहे. पण वेधशाळेच्या मुंबई आधिकाऱ्यांनी याचे नामकरण निसर्ग असे केले असल्याचे सांगितले. सर्वच वादळांचे नामकरण केले जाते. त्यानुसारच याच वादळाचेही नामकरण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

IMD mumbai ststes nisarga will hit alibaug coastal area tomorrow by 0530 hours

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()