बनावट लसीकरण झालेल्यांबद्दल राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

बनावट लसीकरण झालेल्यांबद्दल राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय डेल्टा प्लस ही चिंतेची बाब नाही, असेही आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितले Important Decision taken for victims of fake vaccination scam in Mumbai Minister Rajesh Tope Informs
Rajesh Tope
Rajesh TopeSakal
Updated on

डेल्टा प्लस ही चिंतेची बाब नाही, असेही आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितले

मुंबई: शहरात गेल्या काही दिवसांत एकूण 2 हजार 40 जणांना बनावट लसीकरणाचा (Fake Vaccination Scam) डोस देण्यात आला असल्याची माहिती मुंबई पालिकेने (Mumbai BMC) राज्य सरकारला दिली आहे. जून (June 2021) महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे बनावट लसीकरण प्रकरण झाले. या प्रकरणी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने (Health Department) आज महत्त्वाचा निर्णय घेतला. बनावट लसीकरण झालेल्या नागरिकांना शोधून (Victims of Fake Vaccination) त्यांची नावे केंद्र सरकारला (Central Govt) कळवण्यात येतील. तसेच, त्यांची प्रतिपिंडे (Antibody) तपासून त्या अनुषंगाने त्यांचे जुलैमध्ये लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Important Decision taken for victims of fake vaccination scam in Mumbai Minister Rajesh Tope Informs)

Rajesh Tope
बोगस लसीकरण म्हणजे राज्य सरकारचं अपयश - मुंबई हायकोर्ट

डेल्टा प्लस ही चिंतेची बाब नाही- आरोग्यमंत्री

डेल्टा प्लसच्या तपासणीसाठी प्रत्येक जिल्ह्यातून दर महिन्याला सुमारे 100 नमुने घेतले जात आहेत. म्हणजेच दर आठवड्याला 25 नमुने घेतले जात आहेत. या नमुन्यातून दर महिन्याला व्होल जिनोमिक सिक्वेसिंग केले जात आहे. अशा चार हजार रुग्णांच्या नमुन्यांचे व्होल जिनोमिक सिक्वेसिंग तपासणीत 21 रुग्ण डेल्टा प्लस पॉजिटिव्ह आढळून आले. यातील आतापर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मात्र डेल्टाच्या गुणधर्माविषयी अद्याप स्पष्टता आली नसून विविध तर्कांवर डेल्टा मृत्यू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे यात चिंतेची बाब नसल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

Rajesh Tope
पायी वारी होणार म्हणजे होणारच!; ठाकरे सरकारला आव्हान

सध्याच्या उपलब्ध सांख्यिकी माहितीनुसार तो मृत्यू डेल्टा प्लसमुळे झाला असल्याचे सांगण्यात येत असले तरीही रुग्णाला जोखमीचे आजार आणि मृत्यूस असणारे अनेक कारणे देखील माहितीतून मिळत आहेत. त्यामुळे हा मृत्यू फक्त डेल्टा प्लसने झाला याची खात्री देऊ शकत नसल्याचे टोपे म्हणाले.

देशात एकूण 48 डेल्टा प्लसचे मृत्यू असून यात चिंता करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्यातील ग्रामीण भागात 18 हजार उपकेंद्रे, 2 हजार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. सर्व लसीकरण केंद्रांवर लस वाटप केले जात आहे. लसीकरणात मागे पडलेल्या जिल्ह्याना राज्य लसीकरण सरासरी एवढे आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिवाय जे नागरिक लसीकरण केंद्रावर लसीकरणाला जाऊ शकत नाही अशाना घराजवळ मोबाईल लसीकरण केंद्रातून लस दिली जाईल असे धोरण आखण्यात येत असल्याची माहिती टोपे यांनी यावेळी दिली. तर, कोरोनावर अभ्यास करणाऱ्या शास्त्रीय संस्थांच्या अभ्यासाप्रमाणे कोविशील्ड मधील अंतर बदलत राहील असेही ते म्हणाले.

Rajesh Tope
चित्रा वाघ यांच्यावर भाजपने सोपवली नवी जबाबदारी

लहान मुलांना लसीकरण-

मुंबई महानगर पालिकेने 0 ते 18 वयाच्या मुलांसाठी सिरो सर्वे केला असून यात 50 टक्क्यांहून अधिक मुलांमध्ये प्रतिपिंडे तयार झाल्याचे समोर आले आहे. प्रतिपिंडे तयार झाली असा अभ्यास असला तरी लहान मुलांना लसीकरण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, कोरोना चाचण्यांची संख्या कमी करू नये अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या असून प्रत्येकाने संशय आल्यास तपासणी जरूर करावी. सर्वसामान्यांनी चाचणी, लसीकरण आणि कोविड संबंधित वर्तणुकीचे पालन करावे असे आवाहनही त्‍यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.