मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबईत अनेक केंद्रांवर मतदारांची गैरसोय झाली होती. त्यातून बोध घेत निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी उत्तम नियोजन केले. सायंकाळी पाचपर्यंत मुंबई शहरात ४९ टक्के, तर मुंबई उपनगरात ५१.७६ टक्के मतदान झाले. मुंबईत सकाळच्या सत्रात मतदारांचा निरुत्साह दिसला, मात्र ११ नंतर हळूहळू रांगा दिसू लागल्या. वयोवृद्ध मतदारांची संख्या अधिक दिसली. शाहरूख खानसह अनेक सेलिब्रिटींनी मतदान केले. अभिनेता सलमान खान कडेकोट पोलिस बंदोबस्तात आला होता.