मुंबई : माजी ग्रुहमंत्री अनील देशमुख (Anil Deshmukh) यांच्या वरील भ्रष्टाचाराच्या (corruption) आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने (State Government) नियुक्त केलेल्या न्या चांदिवाल (Justice Chandiwal)आयोगाने माजी पोलीस आयुक्त (Former Commissioner of Police) परमबीर सिंह (Parambir Singh) यांना मंगळवारी (Tuseday) पंचवीस हजार (Twenty five thousand) रुपये दंड सुनावला.
राज्य सरकारने या आरोपांवर चौकशी करण्यासाठी निव्रुत्त न्या के यू चांदिवाल यांची निवड केली आहे. आयोगाने बुधवारी सिंह यांना हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र सिंह बुधवारी हजर झाले नाही. त्यामुळे त्यांना आयोगाने पंचवीस हजार रुपये दंड सुनावला. यापूर्वी देखील आयोगाने याच कारणावरून सिंह यांना पाच हजार रुपये दंड सुनावला होता. तसेच गैरहजेरीत राहण्याची अंतिम मुभा असूनपुढील सुनावणीला हजर राहण्याचा इशारा दिला होता. मात्र तरीही बुधवारी सिंह हजर झाले नाही.
देशमुख यांच्यावर सिंह यांनी पत्राद्वारे भ्रष्टाचार आणि खंडणी वसुलीचे आरोप केले आहेत. सीबीआय या प्रकरणाचा तपासणी करत आहे तर राज्य सरकारने देखील चांदीवाल आयोग नेमला आहे. या आयोगाला सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे विरोध केला आहे. जर सीबीआय या प्रकरणात तपास करत आहे तर मग आयोगाद्वारे तपास कशाला हवा, असा युक्तिवाद सिंह यांच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. मी स्वतः आरोप केले आहेत त्यामुळे माझी चौकशीची आवश्यकता नाही, असा दावा सिंह यांनी केला आहे. याव्यतिरिक्त अन्य दोन गुन्हे रद्द करण्यासाठी देखील त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सीबीआयसह ईडिनेही देशमुख प्रकरणात तपास सुरू केला आहे. तसेच यामध्ये देशमुख यांना दिलासा देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.