डोंबिवली: विद्यार्थिनीच्या वडिलांनी केला शिक्षिकेचा विनयभंग

अंधाऱ्या भागात खेचून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
आरोपी पप्पू सहानी
आरोपी पप्पू सहानी
Updated on

डोंबिवली: अल्पवयीन मुलीवर 33 जणांनी अत्याचार केल्याच्या घटनेतील सर्व आरोपिंना अटक होत नाही तोच अल्पवयीन मुलींचा विनयभंग, फूस लावून पळवून नेणे या घटना डोंबिवलीत उघडकीस आल्या आहेत. शिकवणी घेणाऱ्या 15 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची घटना टिळकनगर पोलीस ठाण्यात तर 13 वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आली आहे. दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या घटनांमुळे कल्याण डोंबिवलीत चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 15 वर्षीय मुलीवर तब्बल 33 जणांनी अत्याचार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक होत नाही तोच कल्याण पूर्वेत एका क्लास घेणाऱ्या शिक्षकाने आठ वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना घडली होती. बाजारपेठ पोलिसांनी तत्काळ शिक्षकांच्या मुसक्या आवळल्या होत्या. यानंतर कल्याण पूर्वेतील कचोरे गावातील शिकवणी घेणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीचा विनयभंग पप्पू सहानी (वय 25) याने केल्याची घटना रविवारी रात्री घडली.

आरोपी पप्पू सहानी
काँग्रेसच्या विनंतीला भाजपाचा मान, राज्यसभा निवडणूक होणार बिनविरोध

पप्पू याची मुलगी पिडीत मुलीकडे शिकवणीसाठी जाते. रविवारी रात्री ती शिकवणीला येणाऱ्या मुलीला घरी सोडायला गेली असता त्या मुलीच्या वडिलांनी म्हणजेच पप्पू याने तिला मुलीला क्लास मध्ये पाठी का बसवते? तिला मारते का? तिला घाणीत का बसवते? असे विचारात घराजवळ असलेल्या अंधाऱ्या भागात खेचून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

मुलीने आरडा ओरडा केल्याने तिची दादी तेथे आली व पप्पू पळून गेला. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल तक्रारीनुसार पहाटे 3 च्या सुमारास पप्पूला अटक केली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण बाकले यांनी सांगितले. आरोपीची मेडिकल चाचणी करण्यात आली असून आज त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.

आरोपी पप्पू सहानी
अडसुळांना ईडीची नोटीस; सोमय्या म्हणाले, 'घोटाळेबाजांविरुद्ध....'

पप्पू सहानी भाजपा कार्यकर्ता

टिळकनगर घटनेतील आरोपी पप्पु सहानी हा भाजपा कार्यकर्ता आहे. स्वतः आरोपी पप्पू याने मी मुलुंड येथील भाजपा गटप्रमुख असल्याचे पत्रकारांना सांगितले. मानपाडा घटनेत राजकीय पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याचे समोर येत असतानाच आता भाजपा कार्यकर्त्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

तर डोंबिवली पश्चिमेत 13 वर्षीय मुलगी हरवल्याची तक्रार सोमवारी 20 सप्टेंबरला विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. दाखल तक्रारीनुसार विष्णुनगर पोलीसांनी मोबाईल लोकेशन आणि गुप्त बातमीदार मार्फत माहिती काढत आरोपीला ठाण्यातून अटक केली. चौकशीत त्याने मुलीला भिवंडीतील काल्हेर गावात एका खोलीत ठेवले असल्याचे सांगितले. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी सांगितले. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून आरोपीने मुलीशी जवळीक वाढवली व नंतर तिला फूस लावून पळवून नेले होते.

या घटनांमुळे कल्याण डोंबिवली नगरीत नेमके चाललंय तरी काय? अल्पवयीन मुलींसोबत घडणाऱ्या या घटनांनी सांस्कृतिक नगरीला विकृतीचे ग्रहण लागले का अशी चर्चा सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()