कोकण दौऱ्यात उदय सामंत-देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्तभेट?

निलेश राणेंचा दावा
कोकण दौऱ्यात उदय सामंत-देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्तभेट?
Updated on

मुंबई: 'तौक्ते' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे तीन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर (kokan tour) होते. यावेळी शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची गुप्तभेट घेतल्याची बातमी आहे. या वृत्तामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विविध तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. माजी खासदार आणि नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी स्वत: टि्वट करुन ही माहिती दिली आहे. (In kokan tour shivsena mla uday samant meet devendra fadnavis nilesh rane claim)

देवेंद्र फडणवीसजी जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले, त्यावेळी रत्नागिरी गेस्टहाऊसवर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी उदय सामंत व त्यांचे बंधू तडफडत होते, असे टि्वट निलेश राणे यांनी केले आहे. दोघांनी शेवटी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीच असा निलेश राणे यांनी दावा केला आहे.

कोकण दौऱ्यात उदय सामंत-देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्तभेट?
हवालदार विलास शिंदे हत्या: मुख्य आरोपीला आजन्म कारावास

स्वत: उदय सामंत किंवा देवेंद्र फडणवीस यांनी बंद दाराआड चर्चा झाली किंवा नाही, या बद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. पण सध्यातरी या भेटीवरुन विविध तर्क-वितर्काना उधाण आहे. उदय सामंत आणि राणे कुटुंबामधील राजकीय मतभेद सवश्रुत आहेत. उदय सामंत आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर २०१४ विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांचे राजकीय वर्चस्व आहे. २००४, २००९, २०१४ आणि २०१९ अशी सलग चार वेळा त्यांनी रत्नागिरीमधुन विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. याउलट निलेश राणे हे एकदाच २००९ मधुन खासदारकीची निवडणूक जिंकली आहे. २०१४, २०१९ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

कोकण दौऱ्यात उदय सामंत-देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्तभेट?
तसं घडलं तर आम्ही नक्कीच पेढे वाटू- संजय राऊत

भाजपाने वादळग्रस्तांना दिलं छप्पर

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर होते. 'तौक्ते' चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांची त्यांनी पाहणी केली. कोकण किनारपट्टी भागाला या वादळाचा मोठा तडाखा बसला होता. अनेक घरांचे, बागायतींचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोकण भाजपाकडून वादळग्रस्तांना तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्यात आली.

देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या अन्य नेत्यांनी वादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यावेळी अनेक नागरिकांनी वादळामुळे घराचे छप्पर उडून गेल्याची व्यथा बोलून दाखवली. त्यांना डोक्यावर छप्पर हवे होते. कोकणातील भाजपा नेत्यांनी तात्काळ पावलं उचलत ज्यांचे घराचे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी कौल आणि पत्र्याची व्यवस्था केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.