मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांना अटक करण्यात आली होती. काही वेळातच त्यांची जामिनावर सुटकाही झाली. पण नारायण राणे यांच्या अटकेमध्ये (rane arrest) राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळे राणे यांच्या अटकेमागे अनिल परब असल्याचे बोलले जात आहे.
एका पत्रकार परिषदेमध्ये अनिल परब फोनवरुन अटकेचे आदेश देत असल्याचे या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी आता अनिल परब यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी, तर आधीपासून अनिल परब यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. रिसॉर्टच्या विषयावरुन त्यांनी अनिल परब यांच्याविरोधात कारवाईची मागणी लावून धरली आहे.
भाजपाने चहूबाजुंनी अनिल परब यांची कोंडी करण्याचे प्रयत्न चालवलेले असताना, आता मुंबईत शिवसैनिकांनी परब यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी सुरु केलीय. जोगेश्वरी मध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. जोगेश्वरीच्या बेहरम बाग परिसरामध्ये हे बॅनर लावण्यात आले आहेत. "संकटाच्या छाताडावर तांडव करणाऱ्यांना शिवसैनिक म्हणतात" असा संदेश या पोस्टरवर लिहिला आहे. अनिल परब साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत, या शब्दात त्यांचे समर्थन करण्यात आले आहे. राजू श्रीपाद पेडणेकर या शिवसेना नगरसेवकाने ही बॅनरबाजी केली आहे.
अनिल परब यांच्या घरावर हल्ला
राज्यांचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अॅड. अनिल परब (anil parab) यांच्या कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथील बंद असलेल्या निवासस्थानी अज्ञाताने सोडा बॉटल मारुन हल्ला चढवला. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला आहे. (konkan update) या प्रकरणी स्थानिकांनी पोलिसांत धाव घेतली असून पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनेला पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी दुजोरा दिला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (konkan News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.