Malad East Accident: मालाड पूर्व येथील नवजीवन SRA प्रकल्प इमारतमध्ये काम सुरु असताना यातील पाच मजूर खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील दोन मजूरचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पोलीस दाखल झाले आहेत.
नवजीवन SRA प्रकल्प इमारतचे काम सुरु होते. यावेळी काही मजूर कामाच्या ठिकाणी होते. अपघाताने पाच मजूर खाली पडल्याची माहिती आहे. दोघांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत, अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झाल्या आहेत. याठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
विक्रोळीत लिफ्टच्या डक्टमध्ये पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रत्रानाकरा फकिरा मुनी (३१) आणि उमा राजेंद्र सामल (२१) अशी मृतांची नावे असून मूळचे दोघे ओडिशाचे रहिवासी आहेत.