Maharashtra Politics : मुंबईत शिंदे गटातील गटबाजी आली समोर; पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत!

ekanath shinde
ekanath shindesakal
Updated on

Maharashtra Politics : मुंबईमध्ये शिंदे गटात चांगलीच गटबाजी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अगदी तोंडावर असतानाच तब्बल 400 पदाधिकारी हे राजीनामा देणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांच्या चिरंजीवांच्या मनमानी कारभाराला कंटाळून कांदिवली, मालाड या विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसण्याची घटना ताजी असतानाच आता अजून एक अशीच घटना शिंदे गटात पाहायला मिळत आहे.

ekanath shinde
Peru Alien News : सात फुटांच्या एलियनने गावकऱ्यांवर केला हल्ला, बंदूकीच्या गोळ्यांनाही देत नाही दाद; प्रत्यक्षदर्शींचा दावा!

विभाग प्रमुखांच्या छळाला कंटाळून जोगेश्वरीतील तब्बल साडेतीनशे ते चारशे पदाधिकारी राजीनामा देणार असल्याचे म्हटले जात आहे. विभाग क्रमांक 4 चे विभाग प्रमुख विजय धीवार व महिला विभाग प्रमुख शिल्पा वेळे यांच्या छळामुळे आम्हाला आत्महत्या करावीशी वाटत असल्याचे उद्विग्न प्रतिक्रिया नाराज पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

ekanath shinde
Mumbai Traffic News : अंधेरीजवळील पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; पण लवकरच...

तर दुसरीकडे खासदार गजानन किर्तीकर यांनी याबाबत आपली वेगळी भूमिका मांडली आहे. गेल्या वर्षभरापासून या पदाधिकाऱ्यांची कार्यपद्धती आम्ही पाहिली असून ते अकार्यक्षम असल्याने त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीने पदमुक्त करण्यात आले होते व त्यांच्या जागी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती असे यावेळी ते म्हणाले. हे वृत्त 'साम' वृत्त वाहिनीने प्रकाशित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.