'मुलीला एकटं सोडू शकत नाही', विलेपार्ल्यात पित्यानेच केली मुलीची हत्या

पत्नीच्या मृत्यूमुळे जितेंद्र नैराश्यात होता. त्याने डिसेंबर महिन्यात दुसरे लग्न केले होते.
जितेंद्र बेडकर
जितेंद्र बेडकर
Updated on

मुंबई: मुंबईत विलेपार्ले भागात (vile parle)एक धक्कादायक घटना घडली आहे. पित्यानेच पोटच्या सहावर्षाच्या मुलीची हत्या (murder) केली. त्यानंतर स्वत: आत्महत्या करुन जीवन संपवलं. जितेंद्र बेडकर असे मृत व्यक्तीचे नाव असून अर्पिता असे त्याच्या सहा वर्षाच्या मुलीचे नाव आहे. जितेंद्रच्या पत्नीचा वर्षभरापूर्वी कोरोनाने मृत्यू झाला होता. पत्नीच्या मृत्यूमुळे जितेंद्र नैराश्यात होता. (In mumbai vile parle area father killed daughter)

जितेंद्रच्या पत्नीचा जून 2020 मध्ये कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याने डिसेंबर महिन्यात दुसरे लग्न केले होते. अर्पिता ही त्याच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर जितेंद्र मानसिक तणावात होता. पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली असून त्याने नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. मुलीला एकटं सोडू शकत नाही म्हणून तिलाही सोबत नेत असल्याचा उल्लेख केला आहे.

जितेंद्र बेडकर
महाराष्ट्रात लॉकडाउन मे अखेरपर्यंत वाढणार, मंत्र्याने दिले संकेत

जितेंद्रला घरातले फोन करत होते. मात्र तो फोन उचलत नसल्याने शेजारच्या व्यक्तींना फोन केला. जितेंद्र घरातून प्रतिसाद देत नसल्याने पोलिसांना बोलवून घराचा दरवाजा तोडला असता. दोघं गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात जितेंद्र यांच्या विरोधात हत्येचा व अपमृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()