ट्रिपला जाणाऱ्यांसाठी चांगली बातमी, मुंबईजवळचं 'हे' स्थान पर्यटकांसाठी खुलं

पर्यटन स्थळ नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिलेली आहेत.
Karnala Bird Sanctuary
Karnala Bird Sanctuary
Updated on

पनवेल: कोरोना संसर्गामुळे (corona virus) मागील काही महिने पर्यटनाकरिता बंद असलेले कर्नाळा पक्षी अभयआरण्य (karnala bird sanctuary) आणि फणसाड (fansad bird sanctuary) (वन्य जीव)अभय आरण्याचे दरवाजे पर्यटकांकरिता पुन्हा खुले करण्याचे आदेश रायगड च्या जिल्हाधिकारी निधि चौधरी (nidhi chowdhary) यांनी शुक्रवारी दिले आहेत. मुबंई-गोवा महामार्गावर पनवेल पासून जवळ असलेले कर्नाळा पक्षी अभयआरण्य व मुरुड तालुक्यातील फणसाड (वन्यजीव)अभयआरण्य ही रायगड जिल्ह्यातील दोन अभयआरण्य पर्यटकांसोबत पर्यावरण प्रेमी पक्षी व प्राणी अभ्यासकांच्या नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिलेली आहेत. (In raigad district karnala & fansad bird sanctuary open for tourist)

विशेषतः पावसाळी पर्यटनाकरिता येणाऱ्या पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी असते. मागील दोन वर्षात निर्माण झालेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनलॉक दरम्यानचा काही कालावधी वगळता सुरक्षिततेचा उपाय म्हणून अभय आरण्यपरिसरात पर्यटनाकरिता येण्यास शासनाच्या वतीने बंदी घालण्यात आली होती.

Karnala Bird Sanctuary
१०० कोटी वसुली प्रकरण: CBI ला मिळाली सचिन वाजेच्या चौकशीची परवानगी

जिल्हाधिकारी निधि चौधरी यांनी शुक्रवारी काढलेल्या आदेशानुसार दोन्ही अभयआरण्यात पर्यटन करण्यास परवानगी देण्यात आलेली असली तरी रायगड जिल्ह्यात कोविड करता तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू असल्याने पर्यटकांनी अभय अरण्यात प्रवेश करताना मास्क वापरण्यासोबत योग्य शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक करण्याच्या सूचना दिल्या असून, नियम न पाळणाऱ्या पर्यटकानवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. आजपासून ही दोन्ही अभयआरण्य पर्यटकांसाठी खुली होणार आहेत. पण दुपारी तीन वाजेपर्यंतच पर्यटकांना इथे भटकंती करता येईल. त्यानंतर प्रवेश मिळणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.