महाराष्ट्रात तरुणाईच्या मृत्यूचे प्रमाण जास्त का ?

या कारणामुळे महाराष्ट्रात तरुणाईला कोरोनाची बाधा
corona Test
corona Test
Updated on

मुंबई: महाराष्ट्रात आलेली कोरोना व्हायरसची दुसरी लाट (corona second wave) तरुणाईसाठी खूपच घातक ठरली आहे. २०२० मधील पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेचा जास्त प्रमाणात तरुणाईला फटका बसला आहे. राज्य सरकारच्या आकेडवारीनुसार, ३० वर्ष वयोगटाच्याआतील ६५१ रुग्णांचा जानेवारी ते नऊ मे दरम्यान मृत्यू झाला. मागच्यावर्षी मार्च ते डिसेंबर या १० महिन्यांच्या कालावधीत ३० वर्षाखालील १,११७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू (corona death) झाला. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये २० ते ४० वयोगटातील १२.९ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली. हा तरुण वयोगट आहे. २०२० मध्ये याच वयोगटातील ७.३ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. (In second wave why youngsters death rate is high in maharashtra)

"दुसऱ्या लाटेत तरुणाईला कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोनामुळे या वयोगटाला अनेक जटिल शारीरिक समस्यांचा सामना करावा लागला. जास्तवेळ ICU मध्ये रहावे लागले, मृत्यूचे प्रमाण वाढले" असे डॉ. अविनाश सुपे म्हणाले. ते राज्य सरकारच्या कोविड डेथ ऑडिट टिमचे प्रमुख आहेत. मृत्यूचे ऑडिट करण्यासाठी नेमलेल्या समितीची शुक्रवारी बैठक होईल. यात तरुणाईच्या मृत्यूचे प्रमाण का जास्त आहे? ते तपासले जाईल. दुसऱ्या लाटेत तरुण-तरुणींना आयसीयूमध्ये दाखल करण्याचे प्रमाण जास्त होते. पहिल्या लाटेत ICU मध्ये दाखल होण्याचे सरासरी वय ५० पेक्षा जास्त होते.

corona Test
"चक्रीवादळाची पूर्वकल्पना असूनही ONGC असं केलंच कसं?"

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा तरुण महिलांवर इतका गंभीर परिणाम झाला नव्हता. त्यांना आता व्हेंटिलेटर सपोर्टची गरज लागतेय, डॉ. वसंत म्हणाले. ते इन्फेक्शन आजाराचे तज्ज्ञ असून राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य आहेत. सध्याच्या घडीला व्हेंटिलेटरवर असलेला सर्वात तरुण मुलगा २१ वर्षांचा आहे, असे डॉ. वसंत यांनी सांगितले.

corona Test
योग्य वेळी आम्ही राज्य सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू - देवेंद्र फडणवीस

डिस्चार्जनंतरही तरुणाईला काही आठवडे ऑक्सिजनचा सपोर्ट लागतोय. ऑक्सिजन सपोर्टशिवाय शरीरातील ऑक्सिजन पातळी ९० पर्यंत खाली येते, असे डॉ. सुपे यांनी सांगितले. व्हायरसमध्ये जे म्युटेशन, परिवर्तन झालं, त्यामुळे तरुणाईला कोरोनाची गंभीर बाधा झाली, असे डॉक्टरांना वाटते. "व्हायरसमध्ये झालेले परिवर्तन हे एक कारण आहे. पण त्याचवेळी कोरोनाची बाधा झाल्यानंतर रुग्ण दाखल होण्यासाठी उशिराने येतात, हे सुद्धा रुग्णाची स्थिती गंभीर होण्यामागे एक कारण आहे" असे डॉ. वसंत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.