Ulhasnagar News: दिवाळी संपताच कर विभागाची टीम टॅक्स वसुलीसाठी मैदानात; मागील रेकॉर्ड तोडण्यासाठी कंबर कसली
Ulhasnagar News: उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर विभागाची महिला अधिकारी निलम कदम यांच्या नेतृत्वाखाली टॅक्स वसुलीसाठी टीम ऑन-द-फिल्ड उतरली आहे. विभागाने मागील वसुलीचा रेकॉर्ड तोडण्यासाठी तयारी केली आहे.
उल्हासनगर: आयुक्त विकास ढाकणे यांच्या आदेशान्वये दिवाळीचे दिवस संपताच उल्हासनगर महानगरपालिका कर विभागाच्या महिला अधिकारी निलम कदम यांची टीम टॅक्स वसुलीसाठी ऑन-द-फिल्ड उतरली आहे.या विभागाने मागील वसुलीचा रेकॉर्ड तोडण्यासाठी कंबर कसली आहे.