Dombivli : ठाकुर्ली, कोपर रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन

Dombivli : डोंबिवलीच्या ठाकुर्ली आणि कोपर रेल्वे स्थानकांवर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. वाढती गर्दी आणि गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेता हे केंद्र प्रवाशांना तात्काळ मदतीची सोय प्रदान करेल.
Police Assistance Center at Thakurli and Koper Railway Station
Police Assistance Centersakal
Updated on

डोंबिवली : लोकलवर वाढणारी गर्दी आणि याच गर्दीचा फायदा उचलत चोरी, लुटमार याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. रेल्वे प्रवासांत वाढलेले गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानकात पोलीस मदत केंद्र असणे गरजेचे आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील कोपर व ठाकुर्ली रेल्वे स्थानकात प्रवाशांची संख्या वाढत असून याठिकाणी पोलीस कक्षाची उभारणी आवश्यक आहे. हे पाहता डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या स्थानकात या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे. यामुळे आता प्रवाशांना काही घटना घडल्यास दिवा, डोंबिवली किंवा कल्याण स्थानक गाठावे लागणार नाही.

मध्य रेल्वे मार्गावरील दिवा, कल्याण, डोंबिवली स्थानकांप्रमाणेच कोपर व ठाकुर्ली रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. लोकलमध्ये वाढणाऱ्या गर्दीमुळे लोकलमधून प्रवास करणे जिकीरीचे झालेले असतानाच हा प्रवास सुरक्षित राहीलेला नाही. लोकलमधील गर्दीचा फायदा घेऊन भूरट्या चोरांचे प्रमाण देखील वाढले आहे.

प्रवाशांचे मोबाईल, दागिने, पर्स लंपास करणे यांसारख्या दररोज घडत असतात. त्यासोबतच अनेकदा कोपर व ठाकुर्ली रेल्वे स्थानकांच्या आसपास अपघात होण्याच्या घटना घडत असतात. अशा काही घटना घडल्यास प्रवाशांना दिवा, डोंबिवली व कल्याण स्थानकात धाव घेऊन घटनेची नोंद किंवा आपली तक्रार नोंदवावी लागत आहे. यामध्ये बऱ्याचदा वेळ जात असल्याने छोट्या मोठ्या चोऱ्या झाल्यास प्रवासी तक्रार करण्यासाठी देखील पुढे येत नाहीत.

रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती गर्दी पाहता त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी कोपर व ठाकुर्ली रेल्वे स्थानकात लोहमार्ग पोलिस ठाण्याअंतर्गत दोन पोलीस मदत केंद्रांचा शुभारंभ रविवारी सकाळी करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या केंद्राचे ओपनिंग करण्यात आले. यावेळी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे उपस्थित होते.

त्यांनी याबाबत सांगितले की, लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेने मदत केंद्र उभारण्यात आली आहेत असे उंदरे म्हणाले. ठाकुर्ली व कोपर दोन्ही स्थानकात पश्चिमेला ते मदत केंद्र ठेवण्यात आले असून अहोरात्र पोलीस त्या स्थानकात कार्यरत असतात. त्यांना ऑनड्युटी असताना त्या मदत केंद्राचा लाभ होईल. तसेच एखादी घटना घडल्यास प्रवाशांना पोलिस सहकार्य हवे असल्यास कुठे जावे याबाबत त्या कक्षातले पोलीस सहकार्य करतील असेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.