मोखाडा: मोखाड्यातील पिंपळाचापाडा येथील आठ वर्षाच्या बालीकेवर अत्याचार करून, तीचा खुन केल्याची घटना 28 ऑक्टोबर ला घडली आहे. या घटनेतील संशयीतास मोखाडा पोलीसांनी अटक केली आहे. अत्याचार करून बालीकेचा खुन करणार्या, नराधमाला फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी मृत बालीकेच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी मोखाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढुन संताप व्यक्त केला आहे.