Mumbai News : संक्रमण शिबिरांऐवजी भाड्याच्या घरांना प्रकल्पग्रस्तांची पसंती

संक्रमण शिबिरांतील गैरसोयींमुळे नागरिकांची पाठ
Inconveniences camps Preference to rental houses Redevelopment old housing buildings mumbai
Inconveniences camps Preference to rental houses Redevelopment old housing buildings mumbaiesakal
Updated on

मुंबई : मुंबईतील अनेक जुन्या चाळी आणि जुन्या गृहनिर्माण इमारतींच्या पुनर्विकास सध्या सुरु आहे. अशातच आगामी प्रकल्पांच्या दृष्टीनेही मुंबईतील संक्रमण शिबिरांचा आढावा घेतल्यास ही संक्रमण शिबिरे अनेकदा गैरसोयींमुळे प्रकल्पग्रस्त नाकारताना दिसतात.

मात्र आज संक्रमण शिबिरांसोबतच प्रकल्पग्रस्त मोठ्याप्रमाणावर भाडं घेण्यास पसंती दर्शवित असल्याचे म्हाडाच्या इमारत दुरुस्ती आणि पुनर्ररचना विभागाने सांगितले. तर लवकरच शिवशाही प्रकल्पातील काही खोल्याही ताब्यात येणार असल्याचे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईतील वरळी बीडीडी चाळ प्रकल्पांसह अनेक महत्वाचे गृहनिर्माण प्रकल्पांचे काम म्हाडा अंतर्गत सुरु आहे.

तर मुंबईत अनेक पुनर्विकास प्रकल्प अद्याप पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र प्रकल्प सुरु होण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन करण्याचे मोठे आव्हान म्हाडा आणि मुंबई महानगरपालिका आणि पुनर्विकास प्रकल्पाच्या विकसकासमोर असते.

अनेकदा यापूर्वी अनेक विकसकांनी प्रकल्प रखडविल्यामुळे पुढील काळात वेळेत भाडं न देण्याच्या घटनाही समोर आल्यामुळे नागरिक अनेकदा संक्रमण शिबीर की भाडं निवडावे याबाबत साशंक असतात.

Inconveniences camps Preference to rental houses Redevelopment old housing buildings mumbai
Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर वनविभाग व रेस्क्यू टीमने मगरीला सुखरूप सोडले अधिवासात

आज म्हाडाची अनेक संक्रमण शिबिरांची अवस्थादेखील धोकादायक झाली आहेत. ३०-४० वर्षांहून अधिक काळ नागरिक या संक्रमण शिबिरांत वास्तव्यास आहेत. हीच संक्रमण शिबिरेही आता दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्याच्या परिस्थितीत आले आहेत. मात्र, हाच तिढा सुटत नसल्याने नागरिक धोकादायक इमारती, पुनर्विकास प्रकल्पात येणारी आपली घर खाली करण्यास नकार दर्शवितात.

घुसखोरी रोखण्याचे आव्हान

राज्य सरकारने २०१९मध्ये एक शासन निर्णय काढला. त्यानुसार संक्रमण शिबिरात राहणाऱ्या शिबिरार्थीची अ, ब, क अशा कॅटेगिरी करण्यात आल्या. सी कॅटेगिरी म्हणजे घुसखोर ज्यांना बांधकाम खर्च + इस्टॅब्लिशमेंट कोस्ट + इतर खर्च + २५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागते. या पॉलिसीविरोधात काही लोक न्यायालयात गेले.

Inconveniences camps Preference to rental houses Redevelopment old housing buildings mumbai
Mumbai Rivers Algae : ठाणे जिल्ह्यातील नद्यांना जलपर्णीचा विळखा; प्रशासनाने वेळीच लक्ष दिले असते तर ...

त्यामुळे सध्या यावर स्थगिती देण्यात आलेली आहे. २०१०साली सर्वप्रथम संक्रमण शिबिरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी अंदाजे ८४४८ इतके घुसखोर आढळून आले होते. आता तो आकडा कमी होऊन अंदाजे ५ हजार घुसखोर आहेत.

सद्यस्थितीत बायोमेट्रिक सर्व्हेक्षणाच्या आधारे सर्वेक्षण केले जाते आहे. तर रिक्त भाडेखोल्याच्या देखरेखीसाठी एका एजन्सीमार्फत लक्ष ठेवले जाते. ही एजन्सी मिळकत व्यवस्थापक यांच्याकडे अहवाल सादर करतात. त्यानुसार कारवाई केली जाते.

मुंबईतील संक्रमण शिबिरांची स्थिती

संक्रमण शिबिरे : ३३
भाडेकरू : २०२६०

Inconveniences camps Preference to rental houses Redevelopment old housing buildings mumbai
Mumbai : कल्याण डोंबिवली पालिकेत दर सोमवारी जनता दरबार

बीडीडी चाळी आणि इतर प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर संक्रमण शिबिरे लागणार आहेत. मात्र आपण प्रकल्पग्रस्तांना ट्रान्झिट कॅम्प आणि भाडे अशा २ सुविधा देतो. त्यामुळे ज्यांना संक्रमण शिबिरे नाकारून भाडं घेण्यास पसंती दर्शवितात.

सद्यस्थितीत ५०० घर भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहेत. मात्र आता ज्या धोकादायक इमारती घोषित करण्यात आल्या आहेत त्यांच्यासाठी ही शिबिरे राखीव ठेवली आहेत. पावसाळयात अनेकदा काही इमारती कोसळतात अशावेळी त्या नागरिकांना तात्पुरते या शिबिरात ठेवले जाते. त्यासाठी काही खोल्या आम्हाला राखीव ठेवाव्या लागतात.
- अरुण डोंगरे, अध्यक्ष, इमारत दुरुस्ती आणि पुनर्विकास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.