मुंबई : मुंबईतील चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक (जेकब सर्कल) मोनोरेलला नवसंजीवनी मोनोच्या संचालन आणि देखभाल यातील कार्यक्षमता सुधारण्यासाठी विभागाचे मोनोरेल प्रमुख बदलण्यात आले. याचप्रमाणे सुधारणांसाठी सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे.
विशेष म्हणजे, गणेशोत्सव काळात रस्त्यांवर गर्दी आणि वाहतूक कोंडीची समस्या पाहता मुंबईच्या मध्यवर्ती भागातून धावणाऱ्या या मोनोला मुंबईकरांनी पसंती दर्शविली आहे. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, मोनोरेलच्या प्रवासी संख्या कमी असण्याबाबतच्या कारणांचा आढावा घेण्यात येत आहे.
तसेच, अपयशांचे विश्लेषण करत समोरील आव्हाने सोडविण्यावर भर देण्यात येत आहेत. सर्वच विभागांना अडचणी आणि चुका कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. यासोबतच, डाउनटाइम कमी करण्यासाठीही प्रशासन प्रयत्नशील आहे. कुठेही बिघाड झाल्यास वेळापत्रकानुसार गाड्या धावण्यासाठी सदोष आरएसटी धावण्यावर आणि त्वरित अतिरिक्त बदल करण्यासासाठी एमएमआरडीए प्रयत्नशील आहे.
गणेशोत्सव काळात मुंबईतील रस्त्यावर मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडीची समस्या असते. याकाळात राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून गणेशभक्त मुंबईत दाखल होतात. विशेषतः लालबाग, परळ आणि दादर येथे भाविकांची मोठी गर्दी असते. याकाळात जलद वाहतुकीसाठी मुंबईकर आणि गणेशभक्तांनी मोनोरेल प्रवासाला पसंती दिल्याचे प्रवाशी संख्येतील वाढीमुळे दिसून आले आहे.
उत्सवाच्या १० दिवसांच्या कालावधीत गणेशोत्सवात १ लाख ५८ हजार १९१ संख्या होती. ही संख्या इतर दिवसांच्या तुलनेत २६ हजार ८८९ने वाढली असल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. तर ९ सप्टेंबर ते २८सप्टेंबर दरम्यान एकूण २० दिवसांची प्रवासी संख्या ही ३ लाख ४३ हजार २७१ इतकी आहे.
"आम्ही अनेक बदल लागू केले आहेत ज्यामुळे मोनोरेल प्रणाली आणि संचलनात लक्षणीय सुधारणा झाली आहे. या बदलांमुळे सकारात्मक परिणाम दिसत आहे. १० दिवसांच्या गणेशोत्सवकाळात वाढलेली प्रवासीसंख्या बदलांचा पुरावा आहे."
- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए
दहा दिवसांतील प्रवासी संख्या
१९/०९/२०२३ -११,६५०
२०/०९/२०२३- १७,६७४
२१/०९/२०२३ -१८,६८८
२२/०९/२०२३ -१८,८२६
२३-०९-२०२३- १६,६४९
२४-०९-२०२३ -१२,४१५
२५/०९/२०२३ -२१,४९३
२६/०९/२०२३ -२१,०६४
२७/०९/२०२३ -२१,३८७
२८/०९/२०२३ -२५,२३४
एकूण- १,८५,०८०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.