मुंबईकरांमध्ये एँटीबॉडीजचे प्रमाण वाढले; कोरोना नियंत्रणात येत असल्याचा सिरो सर्व्हेचा अहवाल

मुंबईकरांमध्ये एँटीबॉडीजचे प्रमाण वाढले; कोरोना नियंत्रणात येत असल्याचा सिरो सर्व्हेचा अहवाल
Updated on

मुंबई  : मुंबईतील 40 पेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींमध्ये एँटीबॉडीजचे प्राबल्य अधिक असल्याचे आढळून आले आहे. या वयोगटातील अनेक व्यक्तींना कोरोनाची बाधा होऊन गेल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र लोकांमध्ये एँटीबॉडीजचे प्रमाण वाढत असल्यानेच मुंबईतील कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे दिसते. 
मुंबईतील कोरोना संसर्गाची स्थिती आणि नेमका परिणाम जाणून घेण्यासाठी आयसीएमआरच्या निर्देशांनुसार पालिकेच्या आरोग्य विभागाने काही भागात सिरो सर्व्हे केला. त्यात हे निष्कर्ष समोर आले आहेत. सर्वाधिक बाधित होणा-या वयोगटामध्ये 31 ते 41 वयेगटातील व्यक्तींना समावेश आहे. त्यांचे बाधित होण्याचे प्रमाण हे 21.34 टक्के इतके असून त्यानंतर 41 ते 50 वयोगट 17.90 , 21 ते 30 वयोगट 16.98 यांचा समावेश आहे. तर 10 वर्षाच्या आतील मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण हे 3.70 टक्के इतके आहे. 

बाधितांमध्ये 40 पेक्षा अधिक वय असणा-या व्यक्तींची संख्या ही अधिक आहे. इतकेच नाही तर ज्यांना कोरोना संसर्ग होऊन गेला,पण ज्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवली नाहीत त्यात ही याच वयोगटातील व्यक्तींची संख्या अधिक असल्याचे ही सिरो सर्व्हेमध्ये समोर आले आहे.
सर्व्हेक्षणाच्या पहिल्या फेरी दरम्यान नमूने घेण्यात आलेल्या सर्व विभागांतील लोकसंख्येमध्ये सर्व वयोगटांमध्ये एँटीबॉडीजचे समान प्राबल्य असल्याचे आढळले होते. तर दुस-या फेरी दरम्यान ऍन्टीबॉडीजचे प्राबल्य हे पुरुषांच्या  तुलनेत महिलांमध्ये किंचितसे अधिक आढळून आले आहे. 

सर्वेक्षणाच्या दुस-या फेरी अंतर्गत आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर याच तीन विभागात सदर सर्वे सप्टेंबर अखेरीस करण्यात आला. या दुस-या फेरी अंतर्गत अंदाजित केलेल्यात 5 हजार 840 नमुन्यां पैकी 5 हजार 384 नमूने संकलित करून अभ्यास करण्यात आला. संसर्गाच्या फैलावाचा वेग कमी होण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे आणि मुखावरण (मास्क) लावणे इत्यादी तत्सम उपाययोजना प्रभावी असल्याचे ही यातून स्पष्ट झाले आहे.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.