Ram Mandir: राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बाजारात कंदील आणि दिव्यांना वाढती मागणी

Ram Mandir vashi
Ram Mandir vashi sakal
Updated on

Ram Mandir: अयोध्येत होऊ घातलेल्या श्री राम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानिमित्ताने देश भर आनंदाचे वातावरण असताना नवी मुंबईतील वाशी बाजारपेठही कुठे मागे राहिलेली नाहीए. २२ जानेवारीच्या दिवसाची राम भक्त आतुरतेने वाट बघत असतानाच वाशी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी रामभक्तांच्या मागणीनुसार विविध प्रकारचे श्री राम लिहिलेले कपडे, झेंडे, टोप्या, पट्टे, बिल्ले, इ. साहित्य खरेदीसाठी उपलब्ध करून दिले आहे.

Ram Mandir vashi
Ayodhya Ram Mandir च्या खाली गाडलं जाणारं टाईम कॅप्सुल, नेमकं आहे काय?

देशात आणि महाराष्ट्रात राम भक्तांनी दिवाळी साजरी करण्याचे ठरवले असून त्या करता लागणारे दिवे, कंदील खरेदीसाठी रामभक्तांची गर्दी वाशी बाजारात दिसून येत आहे. वाशी बाजारात २०० रुपयांपासून ते २५०० रुपयांपर्यंत विविध आकाराचे कंदील उपलब्ध आहेत. तसेच श्री रामांची प्रतिमा असणारे आकाश कंदील हे विशेष आकर्षण ठरत असून राम भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत.त्याचसोबत मोठ्या मंडळांसाठी विशेष कंदील बनवून देण्याची सोय असून मागणीनुसार ४००० ते ५००० रुपयांपर्यंत मोठे कंदील बनवून मिळत आहेत.

Ram Mandir vashi
Ram Mandir Pran Pratistha : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी देशात काय सुरू-काय बंद? जाणून घ्या सविस्तर

दिवाळीत जसे पणत्या आणि दिवे लावून दिवाळी साजरी केली जाते त्याच धरतीवर बाजारातसुद्धा लहान-मोठ्या आकाराचे दिवे व पणत्या उपलब्ध आहेत. त्यांची किंमत ४० रुपयांपासून १२० रुपयांपर्यंत आहे. हे दिवे खरेदी करण्यासाठीही राम भक्तांची लगबग दिसून येते आहे. वाशी बाजारातील ही रेलचेल आणि लगबल पाहता येत्या २२ तारखेला श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होईल व बाजारात मोठ्याप्रमाणात उलाढाल होईल अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

"या सोहळ्यानिमित्त राम भक्तांची कंदीलांसाठीची विशेष मागणी लक्षात घेता. कारागीर कामाला लागले असून मागणी तसा पुरवठा या तत्वानुसार कामकरण्यासाठी व श्री रामांच्या या सोहळ्यात आपलाही हातभार लागावा या भावनेने कारागीर दिवसरात्र मेहनत घेत आहेत."

--- हितेश पटेल, व्यापारी, वाशी बाजारपेठ

Ram Mandir vashi
Ayodhya Ram Mandir : थायलंडच्या ‘अयोध्ये’वरून आली माती अन् पाणी, शहरभर लागणार मोठमोठे स्क्रीन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.