मुंबई : स्वातंत्र्य दिनापासून (independence day) मध्य रेल्वेच्या (central railway) मुंबई-पुणे मार्गावर डेक्कन क्वीनला (deccan queen) विस्टाडोम कोच (vistadome coach) जोडून चालविण्यास सुरूवात केली. या पहिल्यांच दिवशी डेक्कन क्वीन एक्सप्रेसमधील विस्टाडोम कोचच्या पहिल्या फेरीला प्रवाशांनी भरभरून (lots of travelers) प्रतिसाद दिला. तर, सोमवारी, (ता.16) रोजी देखील या डब्याचे आरक्षण झाले आहे. त्यामुळे दोन दिवसासाठी विस्टाडोम कोच हाऊसफुल्ल झाला आहे.
मध्य रेल्वेवरील मुंबई - पुणे डेक्कन एक्स्प्रेसला एलएचबी कोचसह विस्टाडोम कोच 26 जून रोजी जोडला. या कोचमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांची लगबग सुरू आहे. या कोचमध्ये एका महिन्यात प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुंबई-पुणे या मार्गावर धावणाऱ्या आणखीन एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच जोडण्याचे नियोजन सुरू होते. त्यानुसार प्रवाशांच्या मागणीनुसार 15 ऑगस्टला गाडी क्रमांक 02123/02124 सीएसएमटी - पुणे - सीएसएमटी डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्सप्रेस विशेष विस्टाडोम कोच जोडला. या मार्गावर जोडण्यात आलेला हा दुसरा विस्टाडोम कोच आहे.
पावसाळ्यात धबधबे, नाले, झरे, हिरवळ असे निसर्गरम्य सौंदर्य अनुभवण्यासाठी प्रवासी विस्टाडोममधून प्रवास करत आहेत. त्यामुळे पहिल्या दिवसापासून विस्टाडोमच्या सर्वच्या सर्व एकूण 40 आसने आरक्षित झाली. पावसाळ्यात घाटांची दृश्ये मोठ-मोठ्या खिडक्यामधून बघता येत आहेत. त्यामुळे खूप आनंद होत आहे. 75 व्या स्वातंत्र्यदिनी विस्टाडोम कोच जोडण्याचा रेल्वेचा उपक्रम खूप चांगला आहे, असे विस्टाडोममधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रतिक्रिया दिली.
मुंबई ते पुणे डेक्कन एक्स्प्रेमधून 26 जून ते 26 जुलैपर्यंत एकूण 1 हजार 193 प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर, पुणे ते मुंबई परतीच्या प्रवासात याच कालावधीत एकूण 1 हजार 152 प्रवाशांनी प्रवास केला. या एका महिन्यातील तीन दिवस घाट भागातील कामांमुळे आणि अन्य तांत्रिक अडचणीमुळे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. तर, शनिवार-रविवारच्या सुट्टीच्या दिवशी या कोचमधील 44 आसन क्षमता पूर्ण होऊन अधिकचे सुमारे 5 ते 6 प्रवाशांना प्रवास घडत आहे. त्यामुळे डेक्कन एक्स्प्रेसप्रमाणे डेक्कन क्वीनला प्रतिसाद मिळण्याचा विश्वास मध्य रेल्वे प्रशासनाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.