आदिवासी भागात विकासाचा झेंडा कधी फडकणार ? रस्ता नसल्याने गर्भवतींची वाट बिकट

स्वातंत्र्याची 75 वर्षं ऊलटूनही विदारक वास्तव
javhar tribal road
javhar tribal roadsakal media
Updated on

मोखाडा :   स्वतंत्र भारताचा  75  वा स्वातंत्र्य दिन (independence day) मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला गेला. हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून देशात साजरे केले जात आहे. मात्र, स्वातंत्र्याची  75  वर्षे ऊलटूनही पालघर जिल्ह्याचा (palghar) उपजिल्हा असलेल्या जव्हार तालुक्यातील (jawhar taluka) आदिवासी गाव, खेडे पाडे रस्ता, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षण या प्राथमिक सुविधांपासून (basic needs) कोसो दुर आहेत. आजही येथील गर्भवती महिलेला (pregnant woman) दवाखान्यात आणण्यासाठी, रस्ता नसल्याने (no road facility) डोली करून आणावे लागते आहे आणि रस्त्यातच मृत्यूला कवटाळावे लागते आहे, हे आदिवासींचे का देशाचे दुर्दैव आहे ? असा सवाल या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त समोर आला आहे.  

सन  1991 - 92  साली जव्हार तालुक्यातील वावर- वांगणी ग्रामपंचायती मध्ये  125  हुन अधिक बालकांचा कुपोषण आणि ऊपासमारीमुळे भुखबळी गेले होते. त्यावेळी या घटनेने संपुर्ण देश हादरून गेला होता. या घटनेची दखल जागतिक स्तरावर  युनो मध्ये देखील घेतली होती. या घटनेमुळे जव्हार, मोखाडा हे दोन्ही तालुके राज्याच्या नकाशावर ठळकपणे दिसु लागली. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे दौरे या भागात सुरू झाले. मंत्र्यांच्या गाड्यांचा धुराळा ऊडाला तसा आश्वासनांचाही पाऊस पडला. विकासाच्या योजना आखल्या गेल्या. त्यासाठी कोटीच्या कोटी उड्डाणे झाली . मात्र, त्याची अंमलबजावणी कितपत झाली, हे स्वातंत्र्याची  75  वर्षं ऊलटूनही विदारक वास्तव समोर आले आहे. 

javhar tribal road
पहिल्याच दिवशी मुंबई-पुणे डेक्कन क्विनचा विस्टाडोम कोच फुल्ल!

जव्हार तालुक्यातील हुंबरण, सुकळीपाडा, डोंगरीपाडा, ऊदारमाळ, केळीचापाडा, निंबारपाडा, तुंबडपाडा, दखण्याचापाडा, ऊंबरपाडा, मनमोहाडी, भाट्टीपाडा, सावरपाडा, सोनगीरपाडा, घाटाळपाडा, भुरीटेक आणि बेहेडपाडा  या आदिवासी गाव, खेड्यापाड्यात रस्ता, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मुलभुत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. आजही येथील आदिवासी गर्भवती महिलेला प्रसुती साठी, दवाखान्यात आणण्यासाठी डोली करून  7 ते  8  किलोमीटर ची पायपीट करावी लागते आहे.

गतसाली प्रसुती साठी गर्भवती महिलेला डोली करून आणतांना वाटेतच मृत्यू ला सामोरे जावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. तर आठ दिवसांपूर्वी मनमोहाडी तील गर्भवती महिलेला प्रसुती कळा येऊ लागल्याने येथील नागरीकांना या महिलेला डोली करून  8  किलोमीटर पायपीट करत झाप प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे लागले होते. येथे ही अवघड प्रसुती ची सुविधा नसल्याने, या महिलेला जव्हार उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. प्रसुती साठी गर्भवती ची ही फरफट स्वातंत्र्याच्या  75  वर्षात झाली आहे. 

javhar tribal road
लोकलमध्ये 'बाहुबली'चा प्रवास सुरु ; उपनगरीय मार्गावर पूर्ण क्षमतेने धावणार

पालघर चा उपजिल्हा, संस्थान कालीन ऐतिहासिक स्थळ, मिनी महाबळेश्वर, पर्यटन स्थळ अशा नानविध ऊपाधी मिळालेल्या जव्हार च्या आदिवासी गाव पाड्यांची विदारक स्थिती आहे. गतसाली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जव्हार ला भेट दिली होती. तसेच जव्हार चा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्याची संकल्पना आखली आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकार ने जव्हार ला "ब" पर्याटनाचा दर्जा देखील दिला आहे. मात्र, एकीकडे पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधला जाणार असला तरी आदिवासी गाव पाडे प्राथमिक सुविधांपासुन वंचित आहेत. या पाड्यांना स्वातंत्र्याच्या  75  व्या अमृत महोत्सवी वर्षात तरी मुख्य प्रवाहात सरकार आणेल का ? असा सवाल येथील आदिवासींनी ऊपस्थिती केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.