INDIA Meeting: "गरिबांच्या विकासासाठी 'इंडिया' सत्तेत येणं गरजेचं"; अदानींचं नाव घेत खर्गेंची मोदींवर टीका

देशातील वाटचाल हुकुमशाहीकडं सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
Nitish Kumar
Nitish Kumar
Updated on

मुंबई : गरिबांच्या विकासासाठी इंडिया आघाडी सत्तेत येणं गरजेचं आहे, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अदानींचं नाव घेत पंतप्रधान मोदींवर टीका केली. इंडियाच्या मुंबईतील दोन दिवसीय बैठकीनंतर समारोपाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (INDIA Alliance Mumbai Meeting Mallikarjun Kharge slams on Modi Govt)

Nitish Kumar
NCERT ला मिळाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा; शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांची घोषणा

मोदी गरिबांसाठी काम करत नाहीत

खर्गें म्हणाले, "महागाई, बेरोजगारी याविरोधात लढण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मोदी नेहमी 100 रुपयांनी भाव वाढवतात आणि 2 रुपयांनी कमी करतात. आता सिलिंडर गॅस कमी केला पण 200 रुपयांनी पण अजूनही 700 रुपये सिलिंडर आहे. मोदी गरिबांसाठी काम करत नाहीत पण मोठ्या उद्योगपतींसोबत ते चालतात. काल राहुल गांधी यांनी अदानींसंदर्भात सांगितलं. त्यामुळं गरिबांचा जो पैसा लुटला जात आहे, तो थांबवण्यासाठी इंडिया आघाडी जिंकणं आवश्यक आहे"

Nitish Kumar
One Nation, One Election: "...आता वेळ आली आहे"; ‘वन नेशन, वन इलेक्शन’बाबत अजितदादांनी स्पष्ट केली भूमिका

बैठकीतील प्रस्तावांसह देशभरात फिरणार

आजच्या बैठकीत आम्ही प्रस्ताव तयार केले आहेत, त्यानुसार आम्ही काम करणार आहोत. या प्रस्तावांसह देशातील प्रत्येक भागात आम्ही जाणार आहोत. मोदी देशातील स्वायत्त संस्थांचा सत्यानाश करत आहेत. (Latest Marathi News)

Nitish Kumar
India Alliance Meeting : इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची स्थापना; 'या' 14 नेत्यांचा समावेश

मणिपूर जळत होतं, तेव्हा अधिवेशन बोलवलं नाही

मणिपूर जळत होतं तेव्हा केंद्र सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं नाही. कोविडच्या काळातही बोलवलं नाही, नोटबंदी झाली तेव्हा अधिवेशन बोलावण्यात आलं नाही. मग आताच का संसदेचं अधिवेशन बोलावण्यात आलं? देशात हळूहळू हुकूमशाही येत आहे. त्यांना वाटतं मीडिया देखील त्यांच्यासोबत आहे. मीडियाच्या लिखाणावर निर्बंध आणले जाताहेत. (Marathi Tajya Batmya)

Nitish Kumar
One Nation One Election : वन नेशन वन इलेक्शनचा अंदाज ? २ ऑक्टोबरला जाहीर होणार इंडियाचा किमान समान कार्यक्रम!

पुढील बैठक कधी होणार?

पुढील बैठक कुठे आणि कधी घेणार हे आम्ही ठरवू आणि सांगू. आम्हाला ते घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला आम्ही घाबरणार नाही. कुठे कुठे बैठक होईल? सार्वजनिक बैठका होतील? त्या कुठे होतील? त्याबाबत माहिती देऊ.

मोदी खोटं बोलतात पण लोकांना ते खरं वाटतं. मराठीत एक म्हण आहे 'खोटं बोला पण रेटून बोला' असं मोदींचं काम आहे, अशा शब्दांत मल्लिकार्जुन खर्गेंनी मोदी सरकारवर टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.