महासंकट! हिंदी महासागरात होताहेत रहस्यमय हालचाली; वाचा बातमी सविस्तर

महासंकट! हिंदी महासागरात होताहेत रहस्यमय हालचाली; वाचा बातमी सविस्तर
Updated on

जगभराता कोरोनाच्या संकटाने थैमान घातले असताना, भारताच्या दक्षिणेला आणि जगातील तीसरा मोठा समुद्र असलेल्या हिंदी महासागराच्या तळाशी असलेल्या महाकाय टेक्टोनिक प्लेट तुटत आहेत. भारतीय उपखंड आणि ऑस्ट्रेलियन खंडाच्या दरम्याने असलेल्या या प्लेट भविष्यात वेगळ्या होऊ शकतात. परिणामी पृथ्वीवरील जीवसृष्टीवर काही संकट येते की, काय असा प्रश्न शास्त्रज्ञांना पडला आहे. भारतीय उपखंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या समुद्रतळाशी असलेल्या महाकाय प्लेटला कॅपरीकॉर्न टेक्टोनिक प्लेट असेही संबोधले जाते.

एका रिपोर्ट नुसार या दोन खंडांदरम्यानच्या महासमुद्रातील प्लेट वेगळ्या होताना आढळून येत आहेत. एका वर्षात 0.06 इंच या प्लेट सरकत असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. लाईव्ह सायन्सच्या रिपोर्ट नुसार आधी या प्लेट वेगळ्या होत आहेत. याबाबत अंदाज लावणं अवघड होते. परंतु हिंदी महासागरामध्ये दोन भूकंप झाल्यानंतर काही संशोधन करण्यात आले. त्यातून हा प्रकार समोर आला असल्याची माहिती ऑरेली कॉड्यूरिअरी या संशोधकाने दिली आहे.

ऑरेली या संशोधनाविषयी अधिक माहिती देताना सांगतात की, ही एक रहस्यमय हालचाल असून तीन प्लेट एकमेकांना जोडलेले आहेत. या प्लेट एकाच दिशेन अतिशय धीम्या गतीने पुढे सरकत आहेत. या महाकाय प्लेट वेगळ्या होण्याची कारणे भूकंप नसून काहीतरी रहस्यमय वेगेळे कारण आहे.या प्लेट देखील रहस्यमय रित्या तूटत आहेत. खरेतर, पाण्याच्या खाली होणारी हालचालींवर संशोधन करणे अवघड कार्य आहे. परंतु, दोन भूकंपाचे केंद्रबिंदू हिंदी महासागरामध्ये आढळून आल्यानंतर ही बाब समोर आली आहे.  

इंडोनेशिया देशात 11 एप्रिल 2012 मध्ये 8.6 आणि 8.2 रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. या भूकंपाचे केंद्रबिंदू हिंदी महासागरच होते. या भूकंपाचे अधिक संशोधन केल्यावर अशी माहिती समोर आली की, साधारणत: भूकंप हे टेक्टोनिक प्लेट एकमेकांवर आदळल्यामुळे होत असतात. परंतु हे भूकंप या प्लेटच्या मध्यभागातूनच झाले होते. ओरेली आणि त्यांच्या संशोधक टीमने हिंदीमहासागरातील प्लेट तुटत असल्याचे पहिल्यांदा जगासमोर आणले आहे. ऑरेली यांची टीम सध्या वॉरटन बेसिन या विशेष तुटलेल्या झोनवर लक्ष केंद्रीत करीत आहे. हा झोन तोच आहे ज्या ठिकाणी भूकंप झाले होते. तुटलेले क्षेत्र हे भूकंप होण्याचे कारण नाही. कोणत्यातरी रहस्यमय हालचालींमुळे हे भूकंप झाले आहेत. 11 मार्च रोजी जियोफिजिकल रिसर्च लेटर्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानूसार या प्लेट्सना एकमेकांपासून वेगळे होण्यासाठी दहा लाख वर्ष लागू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.