भारतीय स्वातंत्र्य लढ्यानं अनेक देशांनां प्रेरणा दिली - PM मोदी

राजभवनात क्रांतीगाथा गॅलरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं.
PM Modi
PM Modi
Updated on

मुंबई : भारताच्या स्वांतत्र्य लढ्यानं जगातील अनेक देशांच्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा दिली, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजभवनात क्रांतीगाथा गॅलरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं, यावेळी ते बोलत होते. नवीन जलभूषण इमारतीचंही यावेळी उद्घाटनं पार पडलं. यानंतर नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. (India freedom struggle inspired the freedom struggle of many countries says PM Modi)

मोदी म्हणाले, महाराष्ट्रातून गांधीजींनी भारत छोडो आंदोलनाचा सुरुवात केली होती. आजचा कार्यक्रम यासाठी देखील महत्वाचा आहे की, देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रानं देशाला प्रेरित केलं आहे. संत तुकारामांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेकांनी समाजसुधारण्याचं कार्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं जीवन राष्ट्रभक्तीची प्रेरणा देतं.

जेव्हा आपण भारताच्या स्वातंत्र्याबाबत बोलतो तेव्हा अजाणतेपणानं काही गोष्टी विसरतो. स्वातंत्र्यासाठी साधनं अनेक होती पण साध्य एकच होतं. सामाजिक, कौटुंबिक आणि वैचारिक भूमिका काहीही राहिल्या असल्या, आंदोलनाचं स्थान देश-विदेशात कुठेही राहिलं असलं तरी लक्ष एकच होतं भारताचं संपूर्ण स्वातंत्र्य. म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्याचं स्वरुप लोकलही होतं आणि ग्लोबलही होतं. याच कारणामुळं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यानं जगातील अनेक देशांच्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.