मुंबई : इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठकीचा आज मुंबईत समारोप झाला. या बैठकीत आघाडीचा लोगो जाहीर केला जाणार होता पण तो होऊ शकला नाही. लोगो पुढच्या बैठकीत जाहीर केला जाईल, अशी माहिती पत्रकारांना देण्यात आली. पण या बैठकीत लोगो कसा असावा? याबाबत त्यांनी काही सूचना केल्याचं आता समोर आलं आहे. (INDIA Logo was not on agenda Uddhav Thackeray had made an imp suggestion)
इंडियाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीच्या लोगोबाबत विचारण्यात आली. याबाबत माहिती देताना ठाकरे म्हणाले, आपण लोगो बनवण्यापेक्षा जनतेतून या लोगोबाबत कौल मागवण्याच्या सूचना मी केली होती.
त्यासाठी लोकांना काही ठराविक वेळ द्यावा. जनतेतून आलेला लोगो आणखी आपील होईल, असं मत ठाकरेंनी बैठकीत मांडल्याचं त्यांनी सांगितलं. (Latest Marathi News)
दरम्यान, असंही बोललं जात आहे की, इंडियाच्या मुंबईतील बैठकीत लोगोचा विषय अजेंड्यावरच नव्हता. कारण अशा प्रकारचा लोगो प्रकाशित केला तर कदाचित त्यामुळं इंडिया आघाडीतील घटक पक्षांची पक्ष चिन्ह बाजूला पडू शकतात.
ही चिन्हं वर्षानुवर्षे लोकांच्या परिचयाची आहेत. लोगोमुळं आघाडीला फटका बसण्याची भीतीही या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.