''टीम इंडिया जिंकली अन् अभिनंदनाचा प्रस्ताव आशिष शेलारांचा''; अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले? विरोधकांचा सभात्याग

Ambadas Danve in Assembly Session: सभापती या पक्षपातीपणे वागत आहेत. विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू देत नाहीत. सत्ताधारी पक्षाच्या लोकांना काही बोलू देतात.
Ambadas Danve
Ambadas Danve

मुंबई- विधान परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभात्याग केला आहे. विरोधकांना बोलू दिलं जात नाही. सभापती निलम गोऱ्हे पक्षपातीपणाने वागत आहेत, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. यावेळी, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या बाहेर येऊन माध्यमांशी बोलताना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

सभापती या पक्षपातीपणे वागत आहेत. विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू देत नाहीत. सत्ताधारी पक्षाच्या लोकांना काही बोलू देतात. उदाहरणार्थ, भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकला आहे. त्यांचे अभिनंदन करण्याऐवजी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांचे अभिनंदन करा असा प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला, असं दानवे म्हणाले.

Ambadas Danve
Jalgaon Assembly Constituency: शिवसेनेला हव्यात जिल्ह्यात 6 जागा; महायुती, महाविकास आघाडीतही जागा वाटपावरून रस्सीखेच

क्रिकेट संघ जिंकला. खेळाडूंची यात मेहनत आहे. रक्ताचं ते पाणी करतात. त्यांचं अभिनंदन सोडून बोर्डामध्ये असलेल्यांचं अभिनंदन करा म्हणतात. हा खेळाडूंचा अपमान आहे. भाजपला देशाशी काही देणघेणं नाही. स्वत: ओवाळून घेणे, चमकेगिरी करणं असं भाजप नेते करत आहेत. सत्ताधाऱ्यांना बोलू दिलं जातं आणि विरोधकांना बोलू दिलं जात नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी सभात्याग केला आहे, असं दानवे म्हणाले आहेत.

Ambadas Danve
Shrigonda Assembly Election 2024 : विधानसभेचे इच्छुक अलर्ट, सर्वेक्षण सुरू; श्रीगोंद्यात इच्छुकांची वाढली धाकधूक

काँग्रेस नेते भाई जगताप यांनी देखील सरकारवर टीका केली. आशिष शेलार यांचे अभिनंदन करण्याची काय गरज आहे. आयसीआयसीआयचे अध्यक्ष शरद पवार होते. ते बीसीसीआयचे अध्यक्ष नव्हते. ग्राउंडवर काम करणाऱ्या कर्मचारीपासून सर्वांचे अभिनंदन करा. पण, सभापतींकडून जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांची बाजू घेतली जात आहे. सभापती या स्पष्टपणे पक्षपातीपणा करत आहेत असं आम्हाला म्हणायचं आहे, असं भाई जगताप म्हणाले.

विरोधी पक्षाचा अधिकार डावलला जातोय, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे म्हणाले. विरोध यावेळी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com