Indian Railway: भारतीय रेल्वेने ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडलाही टाकले मागे, अनोख्या विक्रमाला गवसणी

Train News: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक भारतीय रेल्वेने केली आहे.
Indian Railway: भारतीय रेल्वेने ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडलाही टाकले मागे,  अनोख्या विक्रमाला गवसणी
Updated on

Mumbai News: भारतीय रेल्वेने गेल्या २४ तासांत तीन कोटी प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवले आहे, ही संख्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. या वर्षभरात एका दिवसात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ही सर्वाधिक संख्या असल्याची माहिती रेल्वेने दिली.

दिवाळी आणि छटपूजेसाठी आपल्या मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी असून रेल्वे प्रवाशांना सोईसाठी भारतीय रेल्वेकडून यावर्षी सुमारे साडेसात हजार विशेष गाड्या चालवल्या जात आहेत; तर गेल्यावर्षी साडेचार हजार विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.