Ukraine-Polland च्या सीमेवर अडकले भारतीय विद्यार्थी

विद्यार्थ्यांमध्ये ठाण्यातील साक्षी इजंतकरचाही समावेश
India Student In Ukraine
India Student In UkraineSakal
Updated on

ठाणे : उणे सहा डीग्री तापमान... दहा किमीची पायपीट... ना खाण्याची सोय, ना राहण्याची... रस्त्याच्या कडेलाच घेतलेला आसरा आणि सीमेवर वाट पाहत खोळबंलेल्या नजरा... युक्रेन- पोलंडच्या सीमेवर मायदेशात परतण्याच्या आशेवर पोहचलेल्या शेकडो भारतीय  विद्यार्थ्यांना सध्या या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यामध्ये ठाणेकर साक्षी इजंतकर या लविवि येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचाही समावेश असून तिच्या महाविद्यालयातील सुमारे २६ जण येथे अडवून पडले आहे. धक्कादायक म्हणजे भारतीय दुतावासानेच त्यांना सुचना देत येथे बोलवले होते. पण ज्यावेळी हे विद्यार्थी तेथे पोहचले तेव्हा दुतावासातील एकही व्यक्ती तेथे हजर नसल्याचे समोर आले आहे.

युक्रेन-पोलंडच्या सीमेवर अडकलेल्या आपल्या मुलीच्या काळजीने अश्विनकुमार इजंतकर यांनी शनिवारी सकाळी नगरविकामंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची मदतीच्या आशेने भेट घेतली आणि या सर्व भयाण परिस्थितीची तसेच वेंâद्र सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षपणाची कहाणी समोर आली. रशियाने युक्रेनवर बॉम्ब हल्ले सुरू केल्यानंतर तेथील मुळ भारतीयांची फरफट सुरू झाली आहे. त्यांना सुखरुप मायदेशात परत आणण्यासाठी युक्रेनच्या भारतीय दुतवासी कार्यालयाने २५ फेब्रुवारीला सुचना प्रसिद्ध करत ज्या विद्याथ्र्यांना पोलंड पार करायचे आहे त्यांना शेहयनी मेडीका सीमेवर येण्यास सांगितले होते.

शेहयनी हे युक्रेनमधील गाव आहे तर मेडीका हे पोलंडमधील गाव असून त्याच्या सीमारेषेला शेहयनीमेडीका असे नाव आहे. ही सुचना मिळताच सीमेपासून ७० किमी अंतरावर असलेल्या लविवि येथील वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे २६ विद्यार्थ्यांचा चमु मायदेशी परतता येईल या आशेने पोहचला. मात्र महाविद्यालयाच्या बसने त्यांना १० किमी आधीच अध्या रस्त्यावर उतरवले. पुढे हे विद्यार्थी टॅक्सी करत आणि पुढचा प्रवास पायीच करत सीमेपर्यंत कसेबसे पोहचले. पण येथे पोहचताच त्यांचा प्रचंड भ्रमनिराश व संताप झाला.

ज्यावेळी हे विद्यार्थी येथे पोहचले तेव्हा हजारो भारतीय तेथे आधीच ताटकळत उभे होते. तर दुसरीकडे भारतीय दुतावासातील एकही अधिकारी तेथे हजर नव्हाता. भारतीय दुतावासाकडून या विद्यार्थ्यांसंदर्भात कोणतीच सुचना प्राप्त न झाल्याने युक्रेनच्या पोलिसांनी त्यांना तेथेच थांबवून ठेवले आहे, अशी माहिती इजंतकर यांच्या मुलीने त्यांना मोबाईलवरू दिली. तुम्ही सुचना प्रसिद्ध करता आणि तिथे पोहचत नाही ही गंभीर बाब असल्याकडे अश्विनकुमार इजंतकर यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणले.

या मुलांकडे मोजकेच कपडे आणि दोन पुस्तके आहेत. तेथील तापमान उणे सहा डिग्री सेल्सिअस आहे. हाडे गोठवणाऱ्या थंडीत या मुलांसह सुमारे ४०० विद्यार्थी तेथे अडकले आहेत. त्यांच्या खाण्याची सोय नाही. मुलींना नैसर्गिक विधीसाठी सोय नाही. सीमा कधी खुली होईल याचा थांगपत्ता नाही. अशा परिस्थितीत हे विद्यार्थी अडकले असून काहीही करा पण त्यांना सुखरुप परत आणण्यासाठी प्रयत्न करा अशी याचना इजप्तकर यांनी केली.

आणि ठाण्यातून चक्रे हलली

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना जेव्हा ही सर्व परिस्थिती अश्विनकुमार इजंतकर यांनी सांगितली तेव्हा क्षणाचाही विलंब न करता त्यांनी सर्वप्रथम केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याशी संपर्वâ साधला. सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली तसेच केंद्र सरकार काय कार्यवाही करत आहे, याची माहिती घेतली. तसेच विदेश मंत्री एस. जयशंकर यांच्याशीही संपर्क साधला.

त्यामुळे भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री साडेआठ वाजता युक्रेन- पोलंडची सीमा या विद्याथ्र्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खुली होईल निदान इतकी माहिती तरी मिळाली असल्याचे अश्विनकुमार इजंतकर यांनी दैनिक सकाळशी बोलताना सांगितले. तसेच त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद मानले असून आता साक्षीसह इतर सर्व भारतीय विद्यार्थी सुखरुप सुरक्षित स्थळी पोहचतील याची प्रतीक्षा असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.