Uday Samant : औद्योगिक क्षेत्रातील रखडलेली कामे मार्गी लागणार

उदय सामंत
उदय सामंतsakal
Updated on

Uday Samant : महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांचे प्रश्न आणि औद्योगिक क्षेत्रातील रखडलेली कामे मार्गी लवकरच मार्गी लागणार आहे. यासाठी आमदार भरत गोगावले यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुरू केलेल्‍या पाठपुराव्याला यश आले आहे. कारखानदारांच्या शिष्टमंडळासमवेत उद्योग मंत्रालयात सर्व संबंधित खात्याच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत रखडलेली कामे मार्गी लावण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले.

महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये लहान-मोठे दीडशे कारखाने सुरू आहेत. महाड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनद्वारे चालवल्या जाणाऱ्या पहिल्या आयएमएस प्रमाणित सीईटीपीच्या उत्कृष्ट पर्यावरपूरक कामगिरीमुळे महाड औद्योगिक क्षेत्रात बरेच नवीन उद्योग येत आहेत. मात्र त्याकरीता औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित समस्यांबाबत व पायाभूत सुविधांसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी कारखानदारांनी केली होती.

महाड एमआयडीसीमध्ये सर्व उद्योगांचे प्रक्रिया केलेले रसायनयुक्त सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी ३०-३५ वर्षे जुनी झाल्याने गळती लागल्याने सीईटीपीचे कार्य थांबवावे लागते. त्यामुळे कमी क्षमतेच्या सांडपाणी पम्‍पिंगमुळे उद्योगांची उत्पादकता ५०% कमी झाली आहे.

एमआयडीसीने २७ किलोमीटर लांबीची वाहिनी टाकण्याचे काम हाती घेतली आहे. याकरिता कारखानदारांनी २५ टक्के निधी दिला आहे. मात्र नवीन वाहिनी टाकण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे महाडमधील उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून ते बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तरी काम सहा महिन्यात पूर्ण व्हावे, वारंवार खंडित होणारा पाणीपुरवठा आणि अत्यंत कमी प्रमाणात पाणीपुरवठ्यावर तातडीने उपाययोजना करावी. एमआयडीसीतील अंतर्गत मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण कॉँक्रीटीकरण मध्ये करावे तसेच कॉलनी व एमआयडीसी अंतर्गत रस्त्यांचे देखील रुंदीकरण व डांबरीकरण करावे आदी मागण्यांचा समावेश आहे. महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष संभाजी पाठारे, सीईटीपीचे अध्यक्ष अशोक तलाठी, सदस्य महेश पुरोहित उपस्थित होते.

उदय सामंत
Uday Samant : महाड औद्योगिक क्षेत्रातील विविध विकास कामांना मंजुरी दिली जाईल !

ट्रक टर्मिनससाठी स्‍वतंत्र भूखंड

ट्रक आणि मोठ्या अवजड वाहनाची वाहतूक लक्षात घेता, एमआयडीसी व अतिरिक्त एमआयडीसीमध्ये दोन स्वतंत्र ट्रक टर्मिनस भूखंड देण्यात यावेत. आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी रस्ता व सध्याच्या एमआयडीसी मधील मुख्य रस्त्यावरील प्रचंड वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी बारसगाव मार्गे अतिरिक्त एमआयडीसी ते भोर रस्त्याची जोडणी करावी. याचबरोबर पुण्याला जाण्याकरिता नवीन शेवते मार्गे नियोजित रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे अशा मागण्यांचा समावेश होता.

सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीचे काम, त्यापुढील आंबेतपर्यत जोडणी न झालेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे, रस्त्याचे काँक्रीटीकरण पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे तसेच बारसगाव ते आमशेतपर्यंतचा पर्यायी रस्ता व पूल ,शेवतेमार्गे पुणे रस्ता आदी कामे मार्गी लावण्याचे आदेश एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना दिले आहेत.

- उदय सामंत, उद्योगमंत्री

उदय सामंत
Uday Samant: मंत्री महोदयांसमोरच झाला बसचा अपघात ; धावून मदत केल्याने होतंय सामंतांचं कौतुक!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.