'मुख्यमंत्री असो वा आमदार, चौकशीसाठी बोलवलं जाईल'; वायरलेस रेकॉर्ड्सही तपासण्याची परवानगी

'मुख्यमंत्री असो वा आमदार, चौकशीसाठी बोलवलं जाईल'; वायरलेस रेकॉर्ड्सही तपासण्याची परवानगी
Updated on

मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरण आता चांगलाच तापलंय. अशात या प्रकरणाच्या चौकशीच्या चाव्या NIA स्वतःच्या हातात घेणार आहे. दरम्यान या चौकशीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांना चौकशीसाठी बोलावण्यात यावं अशी याचिका लाखे पाटील यांनी केली होती. यावर याबाबतच्या सुनावणीदरम्यान चौकशी आयोगाने अत्यंत महत्त्वाची टिप्पणी केलीये. कोरेगाव भीमा प्रकरणाच्या चौकशीसाठी कुणालाही बोलावलं जाऊ शकतं, असं कोर्टाने म्हटलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीच्या याचिकेवरील सुनावणी कोर्टात सुरु आहे. यावेळी कोर्टाने 'कुणालाही बोलावलं जाऊ शकतं' असं म्हटलंय. 

लाखे पाटील यांनी कोर्टामध्ये याबाबत याचिका केली होती. ज्यामध्ये 'महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी बोलावलं जावं' अशी मागणी लाखे पाटील यांच्याकडून करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारादरम्यान मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्याबद्दल जी वक्तव्य केली होती ती वक्तव्य विरोधाभासी असल्याचं म्हटलंय यामध्ये नमूद केलाय. दरम्यान फडणवीसांची चौकशी व्हावी अशी मागणी चौकशी आयोगाकडे लाखे पाटील यांनी केली होती. 

या प्रकरणात ज्या कोणी व्यक्ती प्रकाश टाकू शकतील, त्या सर्वांना आम्ही चौकशीसाठी बोलावू आणि त्यांचा जबाब नोंदवला जाऊ शकतो. मग ते मुख्यमंत्री असो वा आमदार, त्या मान्यवराला चौकशीसाठी बोलावलं जाईल. लाखे पाटील यांचे वकील बी ए देसाई यांनी या संदर्भातील युक्तिवाद केलाय. 

दरम्यान दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या संदर्भातील सर्व पोलिस रेकॉर्ड, वायरलेस रेकॉर्ड, जखमी पोलिस यांना साक्षीसाठी बोलवावं. त्याचप्रमाणे वायरलेसवर तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काय बोलणं झालं होतं?  हे देखील आयोगासमोर सादर करण्याचे आदेश द्यावेत. 'कोरेगाव भीमा'दरम्यान  तेव्हाचे पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक जखमी झाले होते. त्यांना देखील बोलावण्यात यावं, अशी मागणी ऍडव्होकेट  बी ए देसाई यांनी चौकशी आयोगाकडे केली. कोर्टाने ती मागणी देखील मान्य केली आहे. 

inquiry commission says we will call each and everyone who could put light in koregaon bhima case

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.