INSIDE STORY : मुंबईत गेल्या काही वर्षात कोसळ्यात इतक्या 'हजार' इमारती, मृत्यूंचा आकडाही आहे मोठा

INSIDE STORY : मुंबईत गेल्या काही वर्षात कोसळ्यात इतक्या 'हजार' इमारती, मृत्यूंचा आकडाही आहे मोठा
Updated on

मुंबई : इमारती, घरं, भिंती कोसळून मुंबईत 2013 ते 2019 या काळात 300 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजही मुंबईत 351 धोकादायक इमारती उभ्या आहेत.

मुंबई महानगर पालिकेने यंदाच्या पावसाळ्या पुर्वी 443 धोकादायक इमारतींमधिल रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस पाठवली होती. त्यातील 73 इमारती रिकाम्या झाल्या आहेत. याबाबत महापालिकेकडून माहिती देण्यात आली. त्यातील 144 धोकादायक इमारतींमधिल रहिवाशांनी न्यायालयात दावा केल्याने या इमारती रिकामी करता आलेल्या नाहीत. इतर इमारती रिकाम्या करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे ज्या इमारतीची प्रकरणे न्यायालयात आहेत त्यांच्याकडून इमारतीत स्वतःच्या जबाबदारीवर राहाण्याबाबत हमी पत्र लिहून घेतले जाते, असेही पालिकेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलंय. 73 रिकाम्या करण्यात आलेल्या पैकी 19 इमारतींचे वादही न्यायालयात असल्याचे सांगण्यात आले. 

मुंबईत गेल्या 6 वर्षात 3 हजार 945 इमारती, घरे आणि भिंती पडून 300 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 146 जणं जखमी झाले आहेत. तर 2019 मध्ये अशा 622 दुर्घटनांमध्ये 51 जणांचा मृत्यू झाला आहे सोबतच 227 जण जखमी झाले होते. याबाबत शकिल शेख यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत सदर माहिती मिळवलीये. 

इमारत पडणे - घर - भिंती पडणे 

  • 2013 - 531 घटना, 101 मृत्यू, 183 जखमी 
  • 2014 - 343 घटना,   21 मृत्यू, 100 जखमी 
  • 2015 - 417 घटना,   15 मृत्यू, 120 जखमी 
  • 2016 - 486 घटना,   24 मृत्यू, 172 जखमी 
  • 2017 - 568 घटना,   66 मृत्यू, 165 जखमी 
  • 2018 - 619 घटना,   15 मृत्यू, 79 जखमी 
  • 2019 - 622 घटना,   51 मृत्यू, 227 जखमी 

म्हणून घर सोडत नाहीत 

धोकादायक इमारतीतील घर सोडल्यानंतर घरावर अधिकार राहाणार नाही अशी भिती रहिवाशांना असते. जून्या इमारती या प्रामुख्याने भाडे पद्धतीच्या असल्याने मालक आणि भाडेकरुन यांच्यामधील वादामुळेही इमारती रिकाम्या होत नाहीत.

पालिकेचे हमीपत्र 

रहिवाशांनी घरे सोडावी म्हणून महापालिकेने हमीपत्र लिहून देण्यास सुरवात केली आहे. संबंधित घरावर रहिवाशांचा हक्क राहाणार असून इमारतींचा पुनर्विकास झाल्यानंतर नियमानुसार घर मिळेल असे लिहून दिले जाते. मात्र तरीही अनेक रहिवाशी घरं सोडत नाहीत.

( संकलन - सुमित बागुल )

inside story on how many building collapsed incidents recorded in mumbai in last 6 years

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.