पनवेल महापालिकेचा महत्वाचा निर्णय; कोरोना रुग्ण आढळल्यास संबंधित मजलाच होणार सील
खारघर : पनवेल महापालिका हद्दीत एखाद्या परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळल्यास आतापर्यंत संबंधित रुग्ण राहत असलेली इमारत सील केली जात होती. त्यामुळे इमारतीतील इतर नागरिकांना 14 दिवसांसाठी घरातच अडकून पडावे लागत होते. त्यांची मोठी गैरसोयही होत होती. अखेर पनवेल महापालिकेने नियमात बदल केले आहे. आता संपूर्ण इमारतीऐवजी केवळ संबंधित मजलाच सील करण्यात येणार असल्यानचे पालिकेकडून जाहीर करण्यात आले.
महानगरपालिका हद्दीतील इमारतीत वास्तव्यास असणाऱ्या एखाद्या व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग झाल्यास सदर इमारत किंवा सोसायटी कोरोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून सदर सोसायटी सील केली जात होती. त्यामुळे सोसायटीतील इतर सदस्यांना नोकरी, उद्योग, व्यवसाय आणि नोकरीसाठी घराबाहेर जाता येत नसे. त्यामुळे अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते. पालिका हद्दीतील नगरसेवक आणि काही सोसायटीच्या सदस्यांनी कोरोनाची लागण झालेले व्यक्तीचे घर सील करून इमारतीतील इतर सदस्यांना इमारतीबाहेर पडता यावे यासाठी पालिकेने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती.
पनवेल पालिका प्रशासनाने अखेर सोमवारी (ता.17) आदेश पारित करून यापुढे कोरोनाची लागण झालेला मजला सील करण्यात येणार असून विभाग निहाय असलेल्या प्रभाग अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी असे पत्रात नमूद केल्याने इमारततील सदस्य समाधान व्यक्त करीत आहे.
संपूर्ण इमारत सील केल्याने इमारतीतील इतर सदस्यांना नोकरी, उद्योग व्यवसाय तसेच नोकरीसाठी घराबाहेर जाता येत नसे. पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यास पत्र लिहून इमारतीतील नागरिकांची समस्या निदर्शनास आणून दिले होते. पालिकेने या पुढे कोरोनाची लागण झालेल्या इमारती मजला सील करण्याबाबत निर्णय पालिकेने घेतला आहे.
- नेत्रा पाटील, नगरसेविका
-----
संपादन : ऋषिराज तायडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.