"ईद साजरी करण्यापेक्षा कर्तव्य होतं महत्वाचं"; वाचा काही मुस्लिम डॉक्टरांच्या भावना...

ramdan and doctor
ramdan and doctor
Updated on

मुंबई: म्हणतात मुंबई हे असं शहर आहे जे कधीही थांबत नाही. मात्र आज कोरोनाच्या महाभयंकर प्रादुर्भावामुळे हे शहर कधी नव्हे ते पूर्णपणे थांबलं आहे. मुंबईच्या लोकलसह सर्व गोष्टी थांबल्या आहेत. मात्र यामुळे मुस्लिम बांधवांची मात्र निराशा झाली आहे. आधी पवित्र महिना 'रमजान' लॉकडाऊनमध्ये गेला आणि आता रमजान ईदही साजरी करता आली नाही. सरकारकडून मिळालेल्या आदेशांचं काटेकोरपणे पालन करत मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली. मात्र मुस्लिम डॉक्टर त्यांची ईद साजरी करू शकले नाहीत.

कोरोनामुळे डॉक्टर सध्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे महिन्यातला प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी समान आहे. आज ईद होती मात्र त्यांच्या कर्तव्यापुढे त्यांना सणाचंही भान राहिलं नाही. 

कर्तव्य महत्वाचं: 

एकीकडे इतर मुस्लिम बांधवईद असल्यामुळे घरीच नवे कपडे घालून नमाज अदा करत होते. तर दुसरीकडे मात्र हे डॉक्टर्स नेहमीप्रमाणे पीपीई किट घालून रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त होते. एकीकडे इतर लोकं आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत होते तर दुसरीकडे मात्र हे रुग्णांनाच आपलं कुटुंब समजून आपुलकीनं त्यांची विचारपूस करत होते. एकीकडे मुस्लिम बांधव आज या जगाच्या भल्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करत होते तर दुसरीकडे मात्र हे डॉक्टर स्वतः ईश्वर बनून रुग्णांचा जीव वाचवत होते. थोडक्यात काय तर आज ईद साजरी करण्यापेक्षा मुस्लिम डॉक्टरांना त्यांचं कर्तव्य जास्त महत्वाचं होतं. 

पहिल्यांदा ईद साजरी करू शकलो नाही: 

"प्रत्येक वर्षी मी आपल्या कुटुंबासोबत ईद साजरी करतो. मात्र हे वर्ष खूप वेगळं आहे. यावर्षी मी माझ्या कुटुंबासोबत ईद साजरी करू शकलो नाही. मात्र याचं दुःख मला मुळीच नाहीये. कारण रुग्णांचा जीव वाचवणं आणि तुमचं कर्तव्य करत राहणं हीच खरी ईश्वरसेवा आहे. त्यामुळे सुट्टी घेण्याचा विचारही माझ्या मनात आला नाही. आयसीयूमध्ये काम करत असल्यामुळे मी रुग्णांना रोज जीवनाशी संघर्ष करताना बघतो. त्यामुळे मला माझं कर्तव्य महत्वाचं होतं" असं एका आयसीयूत काम करणाऱ्या मुस्लिम बांधवानं म्हंटलंय. 

सण दरवर्षी येईल: 

" एकाच शहरात राहूनही मी आज ईद साजरी करण्यासाठी माझ्या घरी गेलो नाही. माझे रुग्ण हे कोरोनमुळे मृत्यूच्या दाढेत अडकले असताना मी त्यांना सोडून जाऊ शकत नाही. हे वर्ष आणि हा रमजान महिना माझ्यासाठी अतिशय वाईट होता.  दिवसभर पीपीई किट घालून आणि मास्क लावून तुम्ही निर्जल उपवास करू शकत नाही. त्यामुळे मला यावेळी माझे रोझेही करता आले नाहीत. मात्र याचं मला वाईट वाटत नाही. सण दरवर्षी येईल मात्र आता कर्तव्य कर्ण महत्वाचं आहे", असं नायर रुग्णालयातल्या एका डॉक्टरनं म्हंटलंय.

ही सण साजरा करण्याची वेळ नाही:

रुग्णालयात काम करत असताना मी गेल्या १५-२० दिवसात अनेक लोकांचे प्राण जाताना बघितले आहेत. कोरोनामुळे गंभीर लक्षणं नसतानाही तरुण लोकं मृत्युमुखी पडत आहेत. एका तरुणाला जीव सोडतांना बघणं यापेक्षा हृदयद्रावक कुठलीच गोष्ट नाही. जे लोकं लॉकडाऊनचं पालन करत नाहीत ते ही गोष्ट कधीच समजू शकणार नाहीत. त्यामुळे ही सण साजरा करण्याची वेळ नाही तर रुग्णांचे प्राण वाचवण्याची वेळ आहे " अशा भावना एका मुस्लिम आरोग्य कर्मचाऱ्यानं व्यक्त केल्या आहेत. 

त्यामुळे रमजान ईद साजरी करू शकले नाहीत मात्र मुस्लिम आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांचं कर्तव्य अधिक महत्वाचं आहे हेच यातून दिसतंय. त्यांच्या या कार्याला सलाम.   

instead of eid celebration duty was more important said muslim doctors must read story  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.