गिरणी कामगारांच्या घरांची देकारपत्रे देण्याची सूचना

३,८९४ तयार घरांची देकारपत्रे १५ जूनपर्यंत देण्यात यावीत
MHADA mumbai
MHADA mumbaiesakal
Updated on

मुंबई - ‘म्हाडा’च्या लॉटरीतील लाभार्थी गिरणी कामगारांच्या ३,८९४ तयार घरांची देकारपत्रे १५ जूनपर्यंत देण्यात यावीत. तसेच प्राप्त अर्जांची छाननी तत्काळ सुरू करावी, अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

गिरणी कामगारांच्या घरवाटप व त्यांच्या पुनर्वसन संदर्भातील अडचणी जाणून घेण्यासाठी विधानभवनात आयोजित बैठकीत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, की गिरणी कामगारांच्या घरांबाबत अनेक त्रुटी आहेत. त्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळासोबत लवकरच बैठक घेण्यात यावी. अविभाजित जमिनीच्या दाव्यांबाबतची सद्य:स्थिती मुंबई महानगर पालिकेकडून जाणून घेण्यासाठी त्याबाबत बैठक घेण्याच्या सूचनाही त्यांनी म्हाडाला केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.