सर्वसामान्यपणे पन्नाशीनंतर होणाऱ्या कर्करोगांच्या प्रकारांपैकी हा सर्वाधिक आढळणारा कर्करोग. इंग्रजीत त्याला ‘कोलोन कॅन्सर’असेही म्हणतात. कोलोन हा आतड्याचा एक भाग असून पचनसंस्थेतील शेवटचा घटक आहे. त्याची लांबी जवळपास पाच फूट असते. भारतात कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये हा प्रकार सहाव्या क्रमांकावर आहे. धूम्रपान, मद्यपान, स्थूलपणा, आतड्यांसंबंधीचे आजार असल्यास हा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. या कर्करोगात आतडे आणि गुदाशयात पेशींची अनियंत्रित वाढ होते.
भारतातील आकडेवारी
(स्त्रोत ः ग्लोबोकॅन, सन ः २०१८)
रुग्णांचे सर्वसाधारण वय | ४५ ते ५० |
देशातील नव्या रुग्णांची नोंद | ३८,८१८ |
मृत्यू झालेल्यांची संख्या | ३५,१६८ |
मुंबईतील आकडेवारी
(स्त्रोत ः ग्लोबोकॅन, सन ः २०१५)
नोंदणीकृत रुग्ण | २६२ |
त्यातील मृतांची संख्या | १७४ |
कारणीभूत घटक
वयोमर्यादा
सामान्यतः वयाच्या पन्नाशीनंतर पचनसंस्थेशी किंवा आतड्यांशी संबंधित आजार होतात. त्यातून हा कर्करोग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
स्थूलपणा
जास्त वजन असलेल्या लोकांमध्ये हा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.
मद्यपान
प्रमाणापेक्षा आणि नियमित मद्यपान करणाऱ्यांना हा कर्करोग होऊ शकतो.
मधूमेह
मधुमेह असलेल्या लोकांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.
मांसाहार
प्रक्रिया केलेले पदार्थ आणि मोठ्या प्रमाणात मांसाहार करणाऱ्यांना हा कर्करोग होण्याची शक्यता असते.
-------------
लक्षणे
1 सुरुवातीच्या
टप्प्यातील लक्षणे :
पोटदुखी
बद्धकोष्ठता
गॅसेस
अतिसार
शौचावेळी वेदना व रक्तस्त्राव
2 वरील लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास या कर्करोगाचा धोका अधिक वाढतो. त्यावेळी आढळणारी लक्षणे ः
अधिक थकवा, अशक्तपणा जाणवणे
वजनात अचानक घट होणे
शौचास झाल्यावरही वारंवार शौचास जाण्याची इच्छा होणे
वारंवार उलट्या होणे
3 काही रुग्णांमध्ये हा आजार आतड्यातून इतर भागातही पसरतो. त्यावेळी पुढील लक्षणे दिसून येतात.
कावीळ
हातापायावर सूज येणे
श्वास घेण्यास त्रास
हाडांमध्ये फ्रॅक्चर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.