फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्ला यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

rashmi shukla
rashmi shuklasakal media
Updated on

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात (phone tapping case) दाखल झालेला एफआयआर रद्द (FIR cancelation) करण्यासाठी आता पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका (petition in supreme court) दाखल केली आहे. पोलीस बदल्यांबाबत (police job transfer) सायबर पोलीस विभागाने (cyber police) अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख पदावर असताना शुक्ला यांनी पोलीस बदल्यांबाबत गोपनीय अहवाल (confidential report) तयार केला होता. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी संबंधित अहवाल आणि एक पेनड्राईव्ह वृत्तवाहिन्यांसमोर दाखविले होते. (IPS rashmi shukla applied a petition in supreme court for cancelation of FIR in phone tapping case)

rashmi shukla
एसटी संपासाठी गोळा केलेले पैसे गेले कुठे?कर्मचाऱ्यांचा सवाल

राज्य सरकारने तयार केलेला अती संवेदनशील आणि गोपनीय अहवाल उघड कसा झाला, याचा तपास सायबर पोलीस करत आहेत. हा तपास थांबविण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. या निर्णयामुळे आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सीबीआय या प्रकरण तपास करत आहे आणि, त्यामुळे राज्य सरकारने यामध्ये तपास करण्याची आवश्यकता नाही असा दावा शुक्ला यांनी केला आहे. राज्य सरकार जाणीवपूर्वक शुक्ला यांच्या कारवाई करत आहे. त्यामुळे हा एफआयआर रद्द करावा अशी मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.