Anil Deshmukh: शरद पवारांना अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांवर कारवाई होतेय का? अनिल देशमुख म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे.
Anil Deshmukh
Anil Deshmukh esakal
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठिशी असल्याचं दाखवण्यासाठी शक्तीप्रदर्शन केलं.

तसेच शरद पवार, सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. पण रोहित पवारांवरील कारवाई म्हणजे शरद पवारांना टार्गेट केलं जातंय का? यावर आमदार अनिल देशमुख यांनी भाष्य केलं आहे. (Is action being taken against Rohit Pawar to trouble Sharad Pawar Anil Deshmukh said it on)

Anil Deshmukh
Rohit Pawar: ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाण्यापूर्वी रोहित पवार काय म्हणाले? अजित पवारांनाही लगावला टोला

अनिल देशमुख म्हणाले, "चार वर्षांपूर्वी त्यांनी हा प्रयत्न केला. शरद पवारांनाच त्यांनी ईडीची नोटीस पाठवली. सुरुवात त्यांनी शरद पवारांपासून केली. पण जेव्हा शरद पवारांनी स्वतः सांगितलं की मी ईडीच्या कार्यालयात जाऊन जबाब देईन आणि त्यांनी जायची तयारी केली. तेव्हा मुंबई बंद होण्याची वेळ आली. तेव्हा स्वतः मुंबईचे पोलीस आयुक्तांना तिथं हजर रहायला लागलं. त्यामुळं शरद पवारांवर कोणीही दबाव आणू शकत नाही"

Anil Deshmukh
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या निक्की हॅलेंना झटका; न्यू हँपशर प्रायमरीत ट्रम्प यांचा विजय

रोहित पवारांना पाठबळ देण्याबाबत देशमुख म्हणाले, "संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष रोहित पवारांच्या पाठिशी आहेत. रोहित पवार आमचा तरुण सहकारी आहे त्यामुळं आम्ही सर्वजण त्यांच्या पाठिशी आहोत. रोहित पवारांनी ८०० किमी संघर्ष यात्रा चांगली काढली. यामध्ये त्यांनी युवकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात मांडले. चांगलं काम करणाऱ्यांविरोधात सरकार अशा कारवाया करत आहे. अशाच पद्धतीचा त्रास मला दिला, संजय राऊतांना आणि नवाब मलिकांना दिला. रोहित पवार खंबीर नेते आहेत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असंही देशमुख यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()