Mumbai News : आयएसआयएस महाराष्ट्र मोड्युल प्रकरणी 4 फरार दहशतवादी आरोपी एनआयएकडून वॉन्टेड म्हणून घोषित

राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने मंगळवारी आयएसआयएस पुणे मॉड्यूल प्रकरणात फरार आरोपी दहशतवाद्यांच्या विरोधात रोख बक्षीस जाहीर केले आहे.
NIA
NIAesakal
Updated on

मुंबई - राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने मंगळवारी आयएसआयएस पुणे मॉड्यूल प्रकरणात फरार आरोपी दहशतवाद्यांच्या विरोधात रोख बक्षीस जाहीर केले आहे. मोहम्मद शहनवाज, शफी जुम्मा आलम अब्दुल्ला, रिजवान अब्दुल हाजी अली, अब्दुल्ला फैयाज शेख डायपरवाला आणि ताला लिवाकत खान या चारही आरोपींची माहिती देणाऱ्यांना एनआयए प्रत्येकी तीन लाख रुपये देणार आहे.

एनआयएकडून मंगळवारी अधिकृतरीत्या माहिती दिली आहे. या प्रकरणातील आरोपीची माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवली जाणार असल्याची हमी एनआयएने दिली आहे. एनआयएने याप्रकरणी आतापर्यंत केलेल्या तपासात 7 आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी बॉम्ब बनवण्याची कार्यशाळा घेत असल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे.

एनआयएची हमी

मोहम्मद शाहनवाज शफीउज्जमा आलम उर्फ अब्दुल्ला, रिझवान अब्दुल हाजी अली, अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा लियाकत खान या आरोपीवर एनआयए कडून लाखोंचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. दहशतवादी संघटनेचा प्रचार आणि प्रसार केल्या प्रकरणी या आरोपींचा एनआयएच्या वॉन्टेड लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे.

आरोपींना पकडून देणाऱ्यांना बक्षिस दिले जाणार असून माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही एनआयएकडून सांगण्यात आले आहे. एनआयएने नुकतेच, आयएसआयएस महाराष्ट्र मॉड्यूलचा भाग म्हणून पुणे परिसरात छापेमारी केली होती. एनआयएने दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या आणि सक्रिय सहभाग घेणाऱ्या काही आरोपींना अटक केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()