Issue Of Dumping : 2025 मधील घनकचरा प्रकल्पानंतर उल्हासनगरातील डंपिंगचा प्रश्न मार्गी

पालिकेच्या आश्वासनाने काँग्रेसच्या उपोषणाची सांगता
Issue Of Dumping
Issue Of Dumpingesakal
Updated on

उल्हासनगर : धार्मिक स्थळांच्या विळख्यात असलेल्या उल्हासनगरातील डंपिंग ग्राऊंड हटवण्यासाठी काँग्रेसने उपोषण सुरू केले होते.त्यावर अंबरनाथ,कुळगांव बदलापुर नगरपरिषद व उल्हासगनर महानगरपालिका क्षेत्राचा संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प(क्लस्टर)राबविणे बाबत एम.एम.आर.डी.ए मार्फत मौजे वालीवली अंबरनाथ येथील जागेवर घनकचरा प्रकल्प राबविणेबाबत ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना कार्यादेश ही देण्यात आलेले आहेत.सदरचा प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पुर्ण होईल असा अंदाज असून त्यानंतर डंपिंगचा प्रश्न मार्गी लागणार असे लेखी आश्वासन महानगरपालिकेने दिल्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी दोन दिवसांच्या उपोषणाची सांगता केली आहे.

Issue Of Dumping
Nandurbar News : ‘जलजीवन’ चौकशीसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेवर धरणे! आंदोलनात सहभागी होण्याचे खासदार ॲड. गोवाल पाडवींचे आवाहन

10 जुलै पासून उल्हासनगर काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या अध्यक्षतेखाली,"डम्पिंग हटाव" या मोहिमे अंतर्गत आमरण उपोषणाची सुरुवात नेताजी चौक येथे करण्यात आली होती.सदर आंदोलनामध्ये मागील सात वर्षांपासून कॅम्प नंबर 5 येथील डंपिंग ग्राऊंड हटवण्याची आणि स्थलांतरित करण्याची प्रक्रिया कधीपर्यंत सुरू करण्यात येईल ही मुख्य मागणी होती.दुसऱ्या दिवशी 11 तारखेला विधान भवन येथे सुरु असलेल्या अधिवेशना दरम्यान राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटेवार ह्यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ.अझीझ शेख ह्यांना सादर प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले.त्यानंतर सायंकाळी अतिरिक्त आयुक्त किशोर गवस,सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे,सहायक आयुक्त गणेश शिंपी,मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार ह्यांनी उपोषणा स्थळी भेट देऊन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पुर्ण झाल्यावर डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न मार्गी लागणार असे आश्वासन दिले.आणि सरबत दिल्यावर रोहित साळवे यांनी उपोषणाची सांगता केली.

या उपोषणाला काँग्रेस,सेवादलचे जवळपास सर्व पदाधिकारी,महिला आघाडीने सहभाग घेतला होता.दोन हजार नागरिकांनी सह्या करून तसेच आंदोलनास "ह्यूमन राइट्स" संघटनेचे मनीष ठाकूर,नरेश रोहरा,प्रकाश रोहरा,समाज सेवक नरेश ताहिलरामानी,महेश मुलचंदानी,कायद्याने वाघाचे संस्थापक राज असरोंडकर,अध्यक्ष प्रदीप कपूर,ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर,समाजसेवक राजेश फक्के,मोहन पगारे,जन शक्ती पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी,राहुल काटकर,टीम ओमी कलानीचे कमलेश निकम,पियुष वाघेला,शिवाजी रगडे ,माजी नगरसेवक प्रशांत धांडे ,शिवसेना उबठा चे डॉ जे.जे मानकर,रोहित पवार मंच चे रणजित गायकवाड,फुले शाहू आंबेडकर सामाजिक संघटनांचे अध्यक्ष अजय जाधव,लहुजी परिवर्तन सेनेचे गजांना चंदनशिव,भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे सत्यशील उमाळे,शाहिद मारुती जाधव रिक्षा युनियनचे दिगंबर हजारे,भूषण वैराळकर,हेमंत जाधव,ऍड.कल्पेश माने,पराग मोरे,समाजसेवक संजय वाघमारे,निलेश भगत आदींनी उपोषण स्थळी येऊन उपोषणाला पाठिंबा दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com