Rahul Narvekar: मूळ पक्षाची खात्री होत नाहीए, त्यामुळं व्हिपचा निर्णय घेणं अवघड - नार्वेकर

दोनच दिवसांपूर्वी नार्वेकरांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांतील सर्वच आमदारांना कारणेदाखवा नोटीसा पाठवल्या आहेत.
Rahul Narvekar
Rahul NarvekarEsakal
Updated on

मुंबई : शिवेसेनाच्या फुटीनंतर मूळ पक्ष कोणता याची अद्याप खात्री होत नाहीए, त्यामुळं व्हीपचा निर्णय घेणं अवघड आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. दोनच दिवसांपूर्वी नार्वेकरांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांतील सर्वच आमदारांना कारणेदाखवा नोटीसा पाठवल्या आहेत. (It is difficult to decide on whip because parent party is not sure says Rahul Narvekar on Shivsena crisis)

Rahul Narvekar
Tobacco: सरकारी कार्यालयांमध्ये तंबाखूचा तोबरा भराल तर सावधान! आला 'हा' नवा आदेश

पत्रकारांशी संवाद साधताना नार्वेकर म्हणाले, परत एकदा नोटिसा पाठवल्या आहेत. त्यानुसार, आमदारांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यांना पत्र प्राप्त झाल्यानंतर सात दिवसात अभिप्राय कळवायचा आहे. त्याचबरोबर व्हीपची नेमणूक करण्याचा अधिकार राजकीय पक्षाला आहे, असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे. त्यामुळं मूळ पक्ष कोणाचा याची खात्री होत नाहीए, त्यामुळं व्हीपचा निर्णय घेणं अवघड आहे. त्यामुळं आधी मूळ राजकीय पक्ष कोणता हे बघावं लागेल" (Latest Marathi News)

Rahul Narvekar
Uddhav Thackeray: "फडणवीस नागपूरला कलंक आहेत"; उद्धव ठाकरेंची नागपूरमध्ये कडाडून टीका

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांवर अपात्रेच्या कारवाईबाबतची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन महिन्याभरापेक्षा जास्त काळ झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या सर्व आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी नोटिसा पाठवल्या आहेत. (Marathi Tajya Batmya)

Rahul Narvekar
Lokmanya Tilak Award: पुण्यात मोदी, पवार एकाच मंचावर येणार! PM मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर

दरम्यान, माझ्याकडे जयंत पाटील यांनी नऊ आमदारांच्या अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. या याचिकेची स्फुटणी सध्या सुरू आहे. त्याची खात्री पटल्यानंतर पुढची कारवाई करू, अशा शब्दांत नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रश्नावर उत्तर दिलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.