ShivSena Row: "हे आधीच ठरलं होतं त्यानंतर शिवसेना फुटली"; संजय राऊतांचा मोठा दावा

आम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणं पुन्हा भरारी घेऊ असा विश्वासही यावेळी राऊतांनी व्यक्त केला.
Sanjay Raut News
Sanjay Raut Newsesakal
Updated on

मुंबई : निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पण आयोगाचा हा निर्णय आधीच ठरला होता, त्यानुसारच शिवेसना फुटली असा मोठा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (It was already decided then Shiv Sena split Sanjay Raut made claim)

Sanjay Raut News
ShivSena Row: शिवसेनाप्रमुख कोण? शिवसेना भवन कोणाचं?; राऊतांनी स्पष्टच सांगितलं

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता की, धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांनाच मिळेल, हा दावा आता खरा ठरला. या पत्रकारांच्या प्रश्नावर राऊत म्हणाले, राणेंचा दावा खरा ठरला असं म्हणता येणार नाही. कारण हा निर्णय आधीच घेतला होता. त्यानंतर पक्ष फोडला. दिल्लीत बसलेल्या महाशक्तीनं शिंदेंना सांगितलं होतं की, तुम्ही पक्ष सोडून या, तुमचा आकडा झाला की चिन्ह आणि पक्षाचा सातबारा आम्ही तुमच्या नावावर करुन टाकू. त्यामुळं हा दावा नाही तर कारस्थान होतं.

Sanjay Raut News
Uddhav Thackeray : "काहीही असो आम्ही..." ; उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांचा आधार!

या कारस्थानाचा सुगावा आधीच लागला होता. पण हर कुत्ते के दिन ते है, कोकणात जशी माकडं येतात तसे हत्तीही घुसतात हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत राऊत यांनी शिंदे गटाला इशाराही दिला.

Sanjay Raut News
"इंद्रसुद्धा स्वर्गातून खाली येतात तुम्ही तर.." कंगणाने साधला ठाकरेंवर निशाणा Kangana Ranaut

उद्धव ठाकरे म्हणतात तेच बरोबर आहे. खरी शिवसेना जनतेच्या मनात आहे. एक निर्णय विकत घेतला म्हणजे पक्ष तुमचा होत नाही. असे घुसखोर खूप असतात, बांगलादेशी या देशात घुसले म्हणजे हा देश त्यांचा होत नाही, अशा टोळ्या येतात आणि जातात. त्यांची दखल घेण्याची गरज नाही, अशा शब्दांत राऊत यांनी संताप व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.