Paduka Darshan Sohala 2024 : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वस्तूंना भाविकांची पसंती

पूना स्कूल अँड होम फॉर दी ब्लाइंड, ट्रस्टअंतर्गत अंध विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना भाविकांची पसंती मिळत आहे.
Items of disabled students preferred by devotees at Paduka Darshan sohala 2024 sri family guide initiative
Items of disabled students preferred by devotees at Paduka Darshan sohala 2024 sri family guide initiative Sakal
Updated on

नवी मुंबई : पूना स्कूल अँड होम फॉर दी ब्लाइंड, ट्रस्टअंतर्गत अंध विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना भाविकांची पसंती मिळत आहे. ‘सकाळ’च्या श्री फॅमिली गाईड प्रोग्रामअंतर्गत आयोजित ‘श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्या’त या विद्यार्थ्यांचे स्टॉल लावण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी भाविकांना या स्टॉलमधून २०० हून अधिक वस्तू खरेदी केल्या.

दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमध्ये बनविलेल्या गृहपयोगी व शोभेच्या वस्तूंसाठीचा विक्री मेळाव्यास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. पूना स्कूल अँड होम फॉर दी ब्लाइंड, ट्रस्टअंतर्गत अंध विद्यार्थ्यांनी स्टोल, बास्केट, कानटोपी, मेणबत्ती, जेली बाउल, टेबल मेट, ब्रेसलेट, चॉकलेट, पर्स व इतर सर्व वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी विक्री कक्ष (स्टॉल) उभारण्यात आले होते.

पूना स्कूल अँड होम फॉर दी ब्लाइंड, ट्रस्टअंतर्गत अंध विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यांना साहित्य देऊन वस्तू बनवल्या जातात. या वस्तूंची विक्री केल्यानंतर रकमेतील ३० टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते.

- मनीषा खेडकर, वसतिगृह अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.