मुंबई: कोरोना व्हायरसच्या बरोबरीने आता म्युकरमायकोसिस (Mucormycosis) आजाराचं संकटही वाढत चाललं आहे. महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसमुळे आतापर्यंत १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या म्युकरमायकोसिसला काळी बुरशी सुद्धा म्हटलं जातं. म्युकरमायकोसिसच्या वाढीसाठी कोरोना उपचारांना जबाबदार धरणं चुकीचं असल्याचं डॉक्टर तात्याराव लहाने (Tatyarao Lahane) यांनी म्हटलं आहे. (Its inaccurate to blame COVID treatment for increase in Mucormycosis Dr Tatyarao Lahane)
"म्युकरमायकोसिस कोरोना उपचारांमुळे वाढला असता, तर पहिल्या लाटेतही या आजाराचे रुग्ण वाढले असते" असे तात्याराव लहाने म्हणाले. "कोरोना उपचारांमुळे म्युकरमायकोसिस वाढत नाहीय, तर व्हायरसमध्ये म्युटेशन झालय, नवीन स्ट्रेन आलाय. त्यामुळे म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढतायत" असे तात्याराव लहाने यांनी सांगितले.
"हा नवीन स्ट्रेन स्वादुपिंडाच्या बीटासेलवर परिणाम करतोय. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढतेय. त्यामुळे म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहे" असे तात्याराव लहाने यांनी सांगितले. "डायबिटीस असलेल्या रुग्णांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढतेय. उपचारामुळे नाही, तर हा व्हायरसचा एक भाग आहे. जितकी स्वच्छता ठेवता येईल आणि स्वच्छ राहता येईल तितका प्रयत्न करा" असे लहाने म्हणाले.
हा म्युकर जमीन, हवेत असतो. तोंडात, नाकावर काळा डाग किंवा डोळ्यांवर सूज दिसली, तर डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला लहानेंनी दिला. म्युकरमायकोसिसच्या आजारातून रुग्ण बरे होतात असा दावाही त्यांनी केले. फक्त म्युकरमायकोसिसची औषधे खूप महाग आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.