मुंबई : सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन (सीएसआर फंडातून)सरकारी रुग्णालयांना व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले होते. मात्र कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून दिलेली ही व्हेंटिलेटर्स कुचकामी असल्याने जेजे रूग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयाने 81 व्हेंटिलेटर स्वयंसेवी संस्थेला परत केली असून त्या जागी नवी अपग्रेटेड व्हेंटिलेटर संस्थेकडून देण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दिल्लीतील अग्वा हेल्थकेअर सेंटर ने जेजे आणि सेंट जॉर्ज रुग्णालयाला हे व्हेंटिलेटर डोनेट केले होते. एका मशीनची किंमत 2 लाख 50 हजार इतकी असून जगातील सर्वात स्वस्त मशीन असल्याचे सांगितले जाते.तर इतर व्हेंटिलेटर मशीनची किंमत ही साधारणत: 10 लाख रुपये इतकी असते. अग्वा कंपनीच्या या व्हेंटिलेटरचे वजन 3.5 इतके कमी असून तिला वीज देखील पर्यायाने कमी लागते त्यामुळे खर्च कमी होतो. त्यामुळे अतीगंभीर नसलेले कोरोना रुग्णासाठी हे व्हेंटिलेटर मशीन काम करेल अशी अपेक्षा होती.
कोरोना रुग्णांसाठी आणलेल्या या मशीनची चाचणी केली असता त्यातील ऑक्सिजन लेव्हल प्रत्येक वेळी वेगवेगळी दाखवली गेली. त्यातील एक व्हेंटिलेटर सुरू केल्या नंतर ते पुढील पाच मिनिटातच बंद पडले. जेव्हा हे व्हेंटिलेटर आयसीयू मध्ये बसवण्यात आले तेव्हा त्यातील ऑक्सिजन पातळी आवश्यकत्यानुसार वाढत नसल्याचे समोर आले. रुग्णांच्या सुरक्षेसाठी एफआयओ 2 ची लेव्हल ही मशीन व्यवस्थित काम करे पर्यंत साधारणता 100 टक्क्यांपर्यंत न्यावी लागते,त्यानंतरच ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोचतो.
कंपनीच्या या मशीन विषयी मिळालेल्या माहितीनुसार हे मशीनचे रिडींग 100 टक्क्यापर्यंत जात नव्हते शिवाय त्याच्या रिडींग मध्ये देखील समस्या असल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे रुग्णाला किती प्रमाणात ऑक्सिजन दिला जातोय त्याबाबत ही योग्य माहीती मिळत नव्हती.मात्र रुग्णाला इतर ठिकाणच्या व्हेंरिलेटरवर हलवल्यानंतर त्याच्या तब्बेतीत ताबडतोब सुधारणा होत असल्याचे दिसले.
व्हेंटिलेटर मशीनच्या या समस्येबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अग्वा कंपनीच्या वरिष्ठांशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जेजे रुग्णालयाने ही मशीन परत नेण्यास अग्वा हेल्थ केअर सेंटर ला सांगितले. अग्वा कंपनीकडून पाहणी करण्यात आली. त्यानंतर आता 2 नवी अपग्रेटेड व्हेंटिलेटर आणण्यात आली आहेत. मात्र प्रशिक्षणाशिवाय ही नवी मशीन रुग्णांसाठी वापरणार नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून कंपनीला सांगण्यात आले.
मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या प्रयत्नाने जेजे रुग्णालयाला हे व्हेंटिलेटर मिळाले होते.मात्र त्याचा उपयोग नसल्याने ते परत नेण्यास सांगण्यात आले आहे. त्या प्रमाणे एन्जीओला माहिती दिली आहे. नवीन मशीन टेस्ट करून घेतल्या जातील. कोरोना रुग्णांवर त्या कशा चालतात याची पाहणी करून नवी व्हेंटिलेटर ताब्यात ताब्यात घेऊ असे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ तात्याराव लहाने यांनी सांगितले.
अग्वाचे सह-संस्थापक दिवाकर वैश यांनी दावा केला की जुनी व्हेंटिलेटर अग्वा अभियंत्यांनी लावलेले नव्हते. त्यामुळे ते कुचकामी ठरले. मात्र आम्ही आता त्यांना नवीन व्हेंटिलेटर देत आहोत. त्यासारखे व्हेंटिलेटर आम्ही केंद्र सरकारला उपलब्ध करुन दिलेले आहेत. आणि हे नवे आणि अपग्रेटेड व्हेंटिलेटर कोविड रूग्णांसाठी चांगले काम करतात अशी माहिती त्यांनी दिली.
j j hospital will get updated ventilators read full story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.