मुंबई - भारतीय रेल्वेत जगजीवन राम रुग्णालयाने बाजी मारली असुन येथील हजारो रेल्वे कर्मचार्यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने पश्चिम रेल्वेचे बाबू जगजीवन राम हॉस्पिटल शंभर टक्के कोविड रुग्णालय म्हणून घोषणा केली होती. या रुग्णालयाने गेल्या चार महिन्यात भारतीय रेल्वेत उत्कुष्ट कामगिरी केली आहे. आतापर्यंत हजारो कोरोना बाधित कर्मचार्यांना उपचार करुन त्यांना डिस्चार्ज करण्यात आले आहेत. बाबू जगजीवन राम रुग्णालयामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78 टक्के असून भारतीय रेल्वेच्या सर्व कोविड रुग्णालयामध्ये सर्वाधिक आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली होती. केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोविड रुग्णालय उभारण्यावर भर देत होते. कारण, कोरोना बाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत जात होती. अशा कठीण परिस्थिती रेल्वेची मालवाहतूक सुरु होती. त्यामुळे रेल्वेच्या कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांना वेळत उपचार मिळावे, यासाठी भारतीय रेल्वेने काही रेल्वेच्या रुग्णालयाला शंभर टक्के कोविड हॉस्पिटल तयार करण्याची घोषणा केली होती.
भारतीय रेल्वेचे प्रथम कोविड रुग्णालय हे पश्चिम रेल्वेचे बाबू जगजीवन राम हॉस्पिटल होते. आतापर्यंत या रुग्णालयामध्ये कोरोना सदृश लक्षण असलेल्या आणि कोरोनाबाधित अशा 1 हजार 638 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये 1 हजार 253 रुग्णाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले होते. उर्वरित रुग्णांना कोरोनाचे सदृश लक्षण होती. आतापर्यंत या 111 दिवसात बाबू जगजीवन राम रुग्णालयातून 1 हजार 500 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. यातील फक्त 9 रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या एकूण रुग्णांपैकी 54 टक्के रुग्ण 50 वर्षांवरील होते. ज्यामध्ये रेल्वे कर्मचारी, निवृत्त रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटूबियातील सदस्य होते. आतापर्यंत कोरोनामुळे 118 रुग्णांचा मुत्यू झालेला आहे.
78 टक्के रिकव्हरी रेट !
पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयामध्ये दररोज 9 ते 10 रुग्ण दाखल होतात. सध्या परिस्थिती बाबू जगजीवन राम रुग्णालय 141 रुग्णांवर उपचार सुरु आहे. यात 130 रुग्णांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरित 11 रुग्णांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. मात्र, 25 जुलै रोजी पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयामध्ये हजारावा रुग्ण कोरोनापासुन बरा होऊन त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णालयामध्ये गेल्या चार महिन्यात उत्कुष्ट कामगिरी केल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78 टक्के असून ते भारतीय रेल्वेच्या सर्व कोविड रुग्णालयामध्ये सर्वाधिक आहे.
--------------------------------------------------
संपादन - तुषार सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.