Jaipur-Mumbai Exp Firing: गोळीबार, चेन पुलिंग अन् अटक; एक्स्प्रेसमध्ये नेमकं काय घडलं? रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती

या दुर्घटनेत एका पोलीस अधिकाऱ्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
Train
Train
Updated on

Jaipur-Mumbai Exp Firing : जयपूर-मुंबई एक्प्रेसमध्ये आज पहाटे घडलेल्या गोळीबाराच्या थरारक घटनेत एका सहाय्यक उपनिरिक्षकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. एका आरपीएफच्या जवानानं हा गोळीबार केला आहे.

पण या गाडीत नेमकं काय घडलं? आणि याबाबतची अधिकची माहिती काय आहे? याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. (Jaipur Mumbai Express Firing Chain Pulling Arrests What happened in train Railway PRO gives info)

ठाकूर म्हणाले, प्राथमिक माहितीनुसार संपूर्ण माहिती अद्याप कळू शकलेली नाही. यामध्ये एक एएसआय आणि तीन प्रवाशांना गोळी लागली आहे. या चारही जणांचे मृतदेह बोरिवली इथं पोस्टमॉर्टमसाठी उतरण्यात आल्या आहेत. याचा अहवाल आल्यानंतरच त्यांची मेडिकल स्थिती काय आहे? ही माहिती दिली जाईल. (Latest Marathi News)

Train
Mumbai-Jaipur Exp Firing: जयपुर मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार; घटनेत एका पोलीसासह ४ जणांचा मृत्यू

आरोपीनं केली चेन पुलिंग

हा गोळीबार करणारा कॉन्स्टेबल ट्रेनची 'चेन पुलिंग' करुन दहिसरमध्ये उतरला. त्याला आरपीएफच्या पोलिसांनी पकडलं आहे. त्याला अटक करण्यात आली आहे, याचा पुढील तपास केला जात आहे. तो मानसिक तणावाखाली होता की नाही, याची चौकशी सुरु आहे.

त्यानंतर विस्तृत माहिती मिळाल्यानंतरच हे कळू शकेल. ही दुर्घटना सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. ज्या प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे त्याची चौकशी करण्यात येईल तसेच त्यांच्या नातेवाईकांना कळवलं जाईल. आम्ही सध्या हॉस्पिटलमधून रिपोर्ट घेत आहोत. त्यानंतर त्यांची नावं आणि ओळख पटू शकेल, असंही ठाकूर यांनी सांगितलं.

Train
Jaipur-Mumbai Exp Firing : चार जणांचा जीव घेणारा RPFचा कॉन्स्टेबल ताब्यात; 'या' कारणामुळं उचललं टोकाचं पाऊल

जवानाची चौकशी सुरु

अद्याप अटक करण्यात आलेल्या जवानाची चौकशी सुरु आहे. पण त्याच्याकडून माहिती मिळू शकलेली नाही. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या ट्रेनमध्ये काळजी घेतली जात आहे ही ट्रेन आता मुंबई सेन्ट्रल स्थानकात दाखल झाली आहे तसेच इतर प्रवाशांनाही सोडण्यात आला आहे, असंही सुमीत ठाकूर यांनी सांगितलं. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.